स्त्रीचं मौन आणि पुरुषाची समज
स्त्री आणि पुरुष यांचं नातं हे केवळ शरीराचं नसतं… ते आत्म्याचं असतं.
पण कित्येकदा पुरुषाला वाटतं की प्रेम ही एक क्रिया आहे – जी "हवी तेव्हा" घडू शकते.
पण तो विसरतो... स्त्रीसाठी प्रेम ही प्रक्रिया असते.
ती मनाने तयार असते, तेव्हाच ती शरीराने स्वीकार करते.
तिचं शरीर म्हणजे एक मंदिर आहे त्यात प्रवेश करण्यासाठी मनाची पावित्र्य आणि विश्वासाची पूजा लागते.
पाळीच्या कालखंडात स्त्री फिजिकली नाही तर मेंटली अधिक त्रस्त असते.
ती थकलेली असते, कोमेजलेली असते...
पण त्यानंतर जेव्हा तिच्या हार्मोन्सचा नैसर्गिक उत्थानकाळ सुरू होतो
तेव्हा तिचं मन बहरतं, ती पुन्हा आत्मविश्वासाने ओसंडून वाहते.
त्यावेळी जर नवऱ्याने तिच्या मनाची साथ दिली, तिची काळजी घेतली, प्रेमाने समजून घेतलं –
तर ती फक्त शरीराने नाही, तर आत्म्यानेही स्वतःला समर्पित करते.
पण आपण काय करतो?
कुठे ना कुठे ही नैसर्गिक चक्रं न समजून घेतली जातात.
पुरुष आपल्या कामाच्या तणावात, मोबाइलच्या स्क्रोलमध्ये, किंवा स्वतःच्याच अपेक्षांत हरवतो.
स्त्री मात्र आपल्या शरीराशी, मनाशी, आणि त्या बहरत्या भावनांशी एकटी लढते...
आणि मग मनाच्या कोपऱ्यात एक "तुटलेपण" निर्माण होतं.
ती बोलत नाही, पण आतून कोसळते.
ती रडत नाही, पण मनात एक उदास शांतता येते...
स्त्रीला शरीराच्या आधी मन जिंकायला आवडतं.
तीचं मन फुलवायचं असेल, तर तिच्या काळजीत सामील व्हा.
तिच्या वेदनेत सहभागी व्हा.
तिच्या हार्मोन्स, तिच्या वेळा, तिच्या गरजा समजून घ्या.
ही सगळी गोष्ट ही फक्त प्रणयाची नाही...
ही आहे साथीची, समझदारीची आणि आत्मिक प्रेमाची.
"प्रणय हा शरीराचा विषय आहे" असं मानणाऱ्या पुरुषाला बायको कधीच समर्पित होत नाही...
पण जिच्या मनाशी गाठ जुळली, तिचं शरीर आपसूकच खुलतं..."
#स्त्रीसमजूनघ्या
#भावनिकबंध
#साथीचेक्षण
#शरीरमनआणिहृदय
#RealisticMarathiPost
#SamazdariInMarriage
#EmotionalIntimacy
#HormonalUnderstanding
#marathilekh
#vaastavdarshi
#relationshipgoals
Comments
Post a Comment