माणसांच्या गर्दीत हरवलेली माणुसकी
रस्त्याच्या कडेला एक वृद्ध माणूस बसला होता. अंगावर फाटके कपडे, पायात चप्पल नाही, हात थरथरत होते. तो रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे असहाय्य नजरेने पाहत होता. कुणाला तरी मदतीसाठी हाक मारावी, असं त्याला वाटत होतं. पण कोण ऐकणार? गर्दी भरपूर होती, पण माणसं नव्हती!
एका महागड्या गाडीतील व्यक्ती त्याच्याकडे एक कटाक्ष टाकून पुढे निघून गेला. बाईकवरून जाणाऱ्या तरुणांनी त्याच्याकडे पाहून हसत काही कमेंट केल्या आणि गाडी वेगाने निघाली. बाजूच्या दुकानात उभ्या असलेल्या माणसाने कपाळावर आठ्या घालत त्याला दुरूनच हाकलण्याचा प्रयत्न केला. आणि अखेर, एक पाच-सहा वर्षांचा चिमुकला हातात बिस्कीटचा पुडा घेऊन त्या आजोबांसमोर उभा राहिला.
“आजोबा, खाल का?”
तो वृद्ध हसला, डोळ्यांत पाणी आलं.
“बाळा, तुझ्या आई-बाबांनी सांगितलं नाही का, रस्त्यावरच्या लोकांशी बोलू नये?”
“सांगितलंय, पण आई म्हणते, मदत करणं चांगली गोष्ट आहे.”
तो लहानगा आजोबांच्या हातावर बिस्कीट ठेवतो आणि खेळत परत आपल्या आईकडे जातो. त्या वृद्ध माणसाकडे अजूनही काही जण बघत होते, पण मदतीचा हात कुणीच पुढे केला नाही.
आता नाती ही भावनिक राहिलीच नाहीत, तर ती एक व्यवहार झाली आहेत. जेव्हा तुमच्याकडे काही देण्यासारखं असतं, तेव्हा लोक तुमच्या अवतीभोवती राहतात. पण जसेच तुमचं आयुष्य काही कारणांनी मागे सरकतं, तसंच लोकंही हळूहळू मागे सरकायला लागतात.
लग्नाच्या वेळी "आयुष्यभर साथ देईन" म्हणणारी माणसं दोन-तीन वाईट प्रसंग आले, की "हे आता जमणार नाही" म्हणत सोडून जातात. नोकरीच्या ठिकाणी "तू आमचा खास मित्र आहेस" म्हणणारे, तुमची पदोन्नती थांबली की "माफ कर, आता मला वेळ नाही" असं म्हणायला लागतात.
नाती जपण्यासाठी दोघांची तितकीच तळमळ असावी लागते. एकटा माणूस झगडून काय करणार? जी माणसं कारणं काढून निघून जातात, त्यांच्यासाठी दुःख का करायचं? ज्यांना खरंच राहायचं असतं, ती कोणत्याही परिस्थितीत तुमच्यासोबत राहतात.
माणसं बदलत नाहीत, परिस्थिती बदलते
जेव्हा परिस्थिती बरी असते, तेव्हा लोकांना तुमच्यासोबत राहण्यात काहीच अडचण वाटत नाही. पण जसेच संकट येते, तसे काही जण तुमच्यापासून हळूहळू लांब जातात. कारणं काढतात. काहीजण अगदी गप्प निघून जातात. पण ही नाती खरंच होती का?
म्हणूनच, कोणी सोडून गेलं, तर त्यांच्या पाठोपाठ धावू नका. कारण जे तुमच्यासाठी असतील, ते कुठल्याही कारणाशिवाय तुमच्यासोबत राहतील. आणि जे जाणारच असतील, त्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न करून स्वतःला का त्रास द्यायचा?
नाती तीच ठेवा, जी मनाने जोडलेली असतील
आजच्या जगात माणसांच्या गरजा वाढल्या, पण माणुसकी मात्र हरवली. व्यवहाराच्या या दुनियेत जर कोण तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करत असेल, तुमच्या प्रत्येक सुख-दुःखात तुमच्यासोबत असेल, तर त्या नात्याची किंमत करा. बाकी जी नाती फक्त गरजांसाठी असतील, ती वेळ आली की निघून जातीलच.
म्हणूनच, गरज नसतानाही तुमच्या आयुष्यात असणाऱ्या लोकांची जपणूक करा. कारण खरी साथ ही कारणांवर नव्हे, तर निस्वार्थ प्रेमावर टिकून असते.
पुढील असेच कथा व लेख वाचण्यासाठी आपल्या या आयडी ला फॉलो करा
https://www.facebook.com/share/18s97EFGXL/
👍🏻 •ʟɪᴋᴇ •ꜱʜᴀʀᴇ •ᴄᴏᴍᴍᴇɴᴛ
.
.
🔹 शब्दांच्या जगात तुमचं मनःपूर्वक स्वागत! 🔹
💖 शब्दांवर प्रेम असेल, तर आम्हाला नक्की फॉलो करा!
🤝 तुमचा पाठिंबा हीच आमची खरी ताकद!
🌟 प्रत्येक शब्दात एक भावना
📍 नव्या कथा, नवी शायरी – फक्त एका क्लिकवर!
✍️ Follow Us ➱ @writersandeepchavan
#sandeepchavan
#writersandeepchavan
❤️ प्रेम द्या, साथ द्या! 🍁
कृपया कोणीही कथा लेख कॉपी करू नये 🙏🏻
Comments
Post a Comment