विश्वास, प्रायव्हसी आणि नाती


आजकाल नात्यांमध्ये विश्वास आणि प्रायव्हसी या दोन गोष्टींचा सतत संघर्ष सुरू आहे. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असो किंवा नवरा-बायको, एकमेकांचे फोन चेक करणे, मेसेज वाचणे किंवा सोशल मीडियावर नजर ठेवणे याला काही लोक संशय म्हणतात, तर काहींना ते अधिकार वाटतो. पण या सगळ्या गोष्टींचा खरा अर्थ काय आहे?

प्रायव्हसी म्हणजे लपवणं असतं का?

तुमचं नातं इतकं घट्ट असेल, एकमेकांवर प्रेम आणि विश्वास असेल, तर मग फोनमध्ये काय आहे याचा एवढा गुपितपणा का? जर आपणच म्हणतो की आपल्या जोडीदारासोबत सर्वकाही शेअर करतो, त्याला आपलं आयुष्य मोकळेपणाने सांगतो, तर मग एका मोबाईलमध्ये अशी कोणती गोष्ट आहे, जी आपण पार्टनरपासून लपवतो?

हो, प्रत्येक व्यक्तीला स्वतःची एक स्पेस असते. पण जर तीच पर्सनल स्पेस फोनच्या लॉकच्या मागे, सायलेंट नोटिफिकेशन्समध्ये किंवा मेसेज डिलीट करण्यात असेल, तर तिथे काहीतरी चुकतंय हे नक्की!

मोबाईल नाही, तर संशय लपवतोय!

खरं सांगायचं तर, कोणालाही आपल्या जोडीदाराचा फोन बघण्याची खूप मोठी इच्छा नसते. पण काही वागणूकच अशी असते, की ती संशय निर्माण करते.

तुम्ही पार्टनरला भेटल्यावर फोन उलटा ठेवता?

अचानक फोन सायलेंट वर टाकता?

कोणाचा तरी मेसेज येताच हळूच बाजूला जाऊन रिप्लाय देता?

फोनवर बोलताना कधी कधी आवाज हळू होतो?

हे सगळं प्रायव्हसीच्या नावाखाली केलं जातं, पण खऱ्या अर्थाने ते संशयाला खाद्य पुरवतं. एकीकडे म्हणायचं की विश्वास ठेवा, पण दुसरीकडे स्वतःच अशा गोष्टी करायच्या की ज्यामुळे प्रश्न उभे राहतात! मग प्रश्न असा आहे की मोबाईल लपवताय, की नात्यातला विश्वास?

 विश्वास हा दोन्ही बाजूंनी असतो!

कोणत्याही नात्याचा आधार म्हणजे विश्वास. पण तो विश्वास सांगून येत नाही, तो कृतीतून दिसतो!

जर खरंच काही लपवायचं नसेल, तर फोन पार्टनरने घेतल्यावर घाबरण्याची गरज काय?

जर नात्यात पारदर्शकता असेल, तर मोबाईल लॉक मागे ठेवण्याची आवश्यकता काय?

जर खरोखर आपल्याला काही चुकीचं वाटत नसेल, तर पार्टनरने फोन मागितल्यावर पर्सनल स्पेसचा मुद्दा काढायची गरज काय?


हो, जोडीदाराने सतत फोन मागणे, चेक करणे हे चुकीचं आहे. पण जर नात्यात नको असलेल्या लोकांची एंट्री झाली, अनोळखी नाती तयार होत असतील, आणि फसवणुकीचा वास येत असेल, तर मग त्या मोबाईलमध्ये काहीतरी गडबड असते!

मोबाईल नाही, विश्वास द्या!

नातं टिकवायचं असेल, तर मोबाईलवर नाही, तर मनावर विश्वास ठेवा!

तुमचा पार्टनर फोन चेक करतोय याचा अर्थ त्याला संशय वाटतोय, आणि तो विश्वास संपादन करू पाहतोय.

विश्वासाचे नातं मोबाईलच्या स्क्रीनवर नसते, ते वागण्यात दिसत असते.

लपवाछपवी केली, तर संशय वाढतो; आणि जिथे संशय वाढतो तिथे प्रेम झिजतं.


मग नातं वाचवायचं कसं?

तुम्हाला तुमच्या पार्टनरने फोन चेक करणं नको असेल, तर तुमचं वागणं इतकं निर्व्याज ठेवा की त्याला संशयच येणार नाही!

कोणत्याही गोष्टीवरून संशय वाढण्याआधी स्वतःहून स्पष्टता द्या.

विश्वासाला मोबाईलपेक्षा मोठं स्थान द्या, म्हणजे नातं कधीही ढासळणार नाही.

शेवटी...

"मोबाईल नाही, मनातलं शेअर करा,
विश्वास द्या, आणि नातं घट्ट करा! ❤️"

तुम्हाला काय वाटतं? खरंच मोबाईल ही प्रायव्हसी आहे, की लपवण्यासाठी घेतलेली ढाल? 🤔

#विश्वास #नाती #प्रायव्हसी #संशय #नातेसंबंध #मन #सत्यपरिस्थिती #मनापासून #प्रेम #relationshipquotes #trust #love #relationshipadvice


Comments

Popular Posts