मनाचं अपंगत्व – जगासमोरचा अदृश्य अंधार

आपण एखाद्याचं बाह्य रूप बघतो –
हसतंय, बोलतंय, फिरतंय…
सगळं नॉर्मल दिसतं – पण खरंच ते नॉर्मल असतं का?

शरीराचे सगळे अवयव जागी असतात,
डोळे बघतात, पाय चालतात, हात हलतात…
पण जेव्हा मन अपंग होतं,
तेव्हा माणूस चालता चालता हरवतो…
हसता हसता रडतो…
आणि जगासमोर हसून जगतो,
पण आतून विघटत राहतो.

आज लाखो लोक तणाव, नैराश्य, चिंता, एकटेपणा
या अदृश्य आजारांनी झुंजतायत.
कोण म्हणेल?
शरीर फिट आहे, तर माणूसही ठिक आहे!
मात्र सत्य हे आहे की – आज ‘मन’ हेच सर्वात जास्त अपंग झालंय.

प्रेमात फसलेले लोक,
घरच्यांकडून न समजले गेलेले तरुण,
नोकरीच्या अपयशाने तुटलेली माणसं –
हे सगळे शरीराने ठीक आहेत,
पण त्यांच्या मनावर असंख्य जखमा आहेत.

समाज विचारतो – "कसल्या त्रासात आहेस?
सगळं आहे ना तुझ्याकडे? मोबाईल, कपडे, खाणं-पिणं!"
पण कोणी विचारत नाही –
"तुझ्या मनात चाललंय तरी काय?"

मनाचं अपंगत्व केवळ डॉक्टर नाही तर समजून घेणारी माणसंच बरी करू शकतात.
एक खांदा, एक विश्वासाचं वाक्य – "मी तुझ्यासोबत आहे" –
हेच खरं औषध आहे.

आज जगात "मेंटल हेल्थ" ही सगळ्यात दुर्लक्षित गरज आहे.
आपण पाय तुटलेल्या माणसाला रिक्षेत बसवतो,
पण मनाने तुटलेल्या माणसाला "ड्रामेबाज" म्हणतो.

म्हणूनच, जर एखाद्याला चालतं-बोलतं बघून तुम्ही त्याचा दु:खाचा अंदाज करत असाल,
तर एक क्षण थांबा.
बाह्य अपंगत्वं दिसतात, पण मनाचं अपंगत्व –
ते कुणाच्या एक्स-रेत नाही, फक्त माणुसकीच्या नजरेत दिसतं!


#मनाचं_अपंगत्व #वास्तवदर्शीलेख #समाजाचाआरसा #mentalhealthmarathi #तरुणाईचंमन #भावनांचीकिंमत #मानसिकस्वास्थ्य #समजूनघेणं #मराठीलेख #RealMarathiThoughts #MentalStruggles #DepressionAwareness #मनातलंतुटणं

Comments

Popular Posts