आपलेच विसरतो आपण…
माणूस हा मुळात सामाजिक प्राणी आहे. त्याला नाती हवी असतात, जवळीक हवी असते, ओळख हवी असते. पण या सगळ्या गोष्टी शोधत असताना तो कधी कधी इतका हरवतो की, ज्या माणसांनी त्याला चालायला शिकवलं, गिरवायला शिकवलं, दुःखात-सुखात साथ दिली, त्यांनाच तो विसरतो.
आजच्या काळात, सोशल मीडिया, ऑफिसमधील ओळखी, बाहेरचं आकर्षण, नवीन संबंध – या सगळ्या गोष्टींच्या नादात आपण खऱ्या माणसांकडे दुर्लक्ष करतो. आई-बाबांच्या चहा मागण्याकडे दुर्लक्ष करत आपण एखाद्याच्या ‘गुड मॉर्निंग’ मेसेजला तत्परतेने उत्तर देतो.
आई-बाबा जे कायम आपले असतात
आई-वडील हे केवळ जन्मदाते नसतात. ते आपल्या प्रत्येक यशाच्या मुळाशी असतात. आपण शाळेत पहिल्या क्रमांकाने आलो तेव्हा सगळ्यांना सांगून अभिमानाने हसणारे, आपली फिस भरताना स्वतःचे गरजेचे कपडे न घेणारे, आपल्या हट्टासाठी आपली झोप सोडणारे हे आईबाबा.
पण आज… त्यांना फोन करायला वेळ नसतो.
आपण दुसऱ्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर "nice" लिहितो, पण आईच्या डोळ्यात दिसणारं दुःख ओळखत नाही.
कुटुंब – जे आपल्यासाठी कायम उभं असतं
कधी कधी आपण ‘फॅमिली’ या शब्दाचा अर्थ "friends like family" असा करून घेतो. पण खरं म्हणजे, जी माणसं आपल्या चुका ऐकून घेऊनही आपल्याला समजून घेतात, त्यांच्याच बोलण्याचं आपण दुर्लक्ष करतो.
कोणी नवीन ओळखीतील व्यक्ती एखादा प्रश्न विचारतं, तर आपण तासंतास त्याच्यासोबत चर्चा करतो, पण बहिणीने विचारलेल्या "कसा आहेस रे?" या प्रश्नाचं उत्तरही कोरडं असतं.
जेव्हा वेळ निघून जाते...
वडिलांचा अचानक झालेला आजार, आईचा एकांतात हुंदका, आजीच्या हातचं शेवटचं जेवण... ही सगळी 'कधी तरी भेटू' म्हणताना निघून जाते.
तेव्हा उरतं फक्त पश्चाताप.
"आईला फक्त ५ मिनिटं बोलायचं होतं..."
"बाबांच्या सोबत गप्पा मारायला वेळ नव्हता..."
"आजीचा वाढदिवस विसरलो..."
हे सगळं जेव्हा आठवतं, तेव्हा समोर तोच मोबाईल असतो – पण आतमध्ये कोणाचंच रिप्लाय येत नसतो.
शेवटी आपलेच उरतात...
दुसरे जेव्हा साथ सोडतात, तेव्हा आपली छाया बनून उभे राहतात ती आपली माणसं.
त्यांच्यासाठी वेळ देणं, त्यांचं दुःख ऐकणं, त्यांच्या आयुष्यात भाग घेणं – हेच खरं नातं टिकवणं असतं.
तुमचं प्रेम करा, नवी नाती जोडा – पण जुनी नाती विसरू नका.
जी माणसं रक्ताने नाही, पण अश्रूने आपल्याशी जोडली जातात – त्यांना विसरू नका.
बाहेरच्यांच्या नादात इतकं गुंतू नका की, आपल्या घरच्यांच्या डोळ्यांतील आसवांचंही भान राहू नये.
जे आपले होते, तेच शेवटी उरतं – बाकीचं सगळं क्षणिक आहे...
#वास्तवदर्शीलेख #आईवडील #कुटुंबाचेमहत्त्व #प्रेमआणिप्रतिबद्धता #भावनिकलेखन #मराठीमन #घरचीमाणसं #प्रत्येकाचंआयुष्य #समाजआरसा #मनापासूनलेख
Comments
Post a Comment