फॅशनच्या दुनियेत हरवलेली शांती



आजकाल सोशल मिडिया उघडलं की एक गोष्ट अगदी ठळकपणे लक्षात येते —
नवीन कपडे, नवीन शूज, नवीन फोन, नवीन ट्रेंड्स...
जणू प्रत्येकाचा चेहरा नाही, तर ब्रँड दाखवायचा असतो.

रोज नवीन फॅशन येते, आणि त्या फॅशनच्या नादात अनेकजण आपले महिन्याचे अर्ध्याहून अधिक पैसे खर्च करत असतात.
साडी असो, कुर्ता असो, ड्रेस असो, किंवा एखादा महागडा गॅझेट —
सगळं हवं असतं. कारण "स्टोरी" टाकायची असते.
"लुक कम्प्लीट" दाखवायचा असतो.
"आपणही काहीतरी आहोत" असं जगाला दाखवायचं असतं.

पण…

मग जेव्हा अचानक एखादी अडचण येते —
घरात एखादा आजारी पडतो,
किंवा नोकरी जाते,
किंवा एखादा महत्त्वाचा खर्च अचानक डोक्यावर येतो —
तेव्हा हाच ड्रेस, हेच शूज, हेच गॅझेट — काहीच उपयोगी पडत नाही.

तेव्हा लक्षात येतं —
“त्या वेळेस जर थोडं बाजूला ठेवलं असतं,
तर आज काहीतरी उपयोग झालं असतं.”
पण तेव्हा फॅशन महत्त्वाची वाटली होती, सुरक्षितता नव्हे.

आजच्या काळात फॅशन वाईट नाही, पण त्यासाठी स्वतःच्या गरजा आणि भविष्यातल्या अडचणी विसरणं हे धोकादायक आहे.

कपडे बदलले की आत्मविश्वास वाढतो — हे खरं.
पण गरज नसताना केवळ समाजात "fit in" होण्यासाठी आपण जर आर्थिक ताण निर्माण करत असू,
तर ते आत्मविश्वास नाही — तो आभास आहे.

आजवर कुणीही नवीन ड्रेसमुळे जगला नाही,
पण वेळच्या वेळी ठेवलेले पैसे — कुणाचं तरी घर वाचवू शकतात.

अर्थशास्त्र सांगतं —
"श्रीमंत होणं म्हणजे जास्त कमवणं नव्हे, तर शहाणपणानं खर्च करणं."
म्हणूनच प्रत्येक ट्रेंडसोबत स्वतःचं आर्थिक भान जपणं ही खरी फॅशन आहे — "फ्युचरची फॅशन!"


#फॅशनकी_गुलामी
#खरे_आवश्यक_काय
#वास्तवदर्शी_लेखन
#मूल्यांची_शिकवण
#RealisticMarathiWriting
#SocietyMirror
#कंटाळलेली_हव्यास
#सांभाळलेली_उद्या
#सावध_समाज
#विचार_करूया
#FinancialAwarenessMarathi

Comments

Popular Posts