आई, थांब गं… संसार बिघडतोय!
लग्नाला अवघे काही महिने झाले. संसाराची गोडी अजून ओठांवर होती. प्रेम होतं, पण त्याहूनही जास्त अपेक्षा होत्या. प्रत्येक दिवस नवीन होता… पण मध्येच कुठेतरी ते "नवीन" थांबलं. कारण, सासरातलं वातावरण नवऱ्याइतकं आपलंसं वाटलं नाही, आणि मग सुरू झाला एक नवीन खेळ… तक्रारींचा!
सासूबाई बोलल्या – वाक्य माहेरी.
नवऱ्याने पैसे उशिरा दिले – तक्रार माहेरी.
रोजच्या किरकोळ गोष्टी – फोनवर आईशी चर्चा.
प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव आईला सांगितला जात होता. आई दुसरीकडे काळजीने भारावून गेलेली. तिनेही आयुष्यभर ऐकलं होतं, तगमगलेली होती – आणि आता लेकीला तसे जगू द्यायचे नव्हते. त्यामुळे तिने घेतलेला प्रत्येक निर्णय तिच्या "मायलेकीच्या प्रेमावर" बेतलेला होता – पण वास्तवात तो निर्णय एक संसार उद्ध्वस्त करणारा ठरत होता.
आई म्हणाली – “माझी लेक रडू नये, म्हणून मी लढतेय.”
पण कोणासाठी?
लेकासाठी की तिच्या हट्टासाठी?
ती आई विसरली होती की मुलीचं लग्न म्हणजे फक्त गुण-जुळवणं नाही, तर स्वतःला बदलणं, समजून घेणं आणि नात्यांना सांभाळणं हे आहे.
ती आई विसरली की – संसार चालवण्यासाठी आईचा हस्तक्षेप हक्क नव्हे, तर हानीकारक ठरतो.
संसाराचं गणित खूप सूक्ष्म असतं.
इथे समजून घेणं हेच मूलभूत सूत्र असतं.
इथे "मीच बरोबर" म्हणणं म्हणजे एकमेकांना गमावणं.
आजच्या आई-बापांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे –
मुलगी तुमची असली तरी तिचं आयुष्य आता तिच्या नवऱ्यासोबत जोडलेलं आहे.
ती तुमची लेक राहते, पण ती आता एकाची बायकोदेखील आहे.
आईचं प्रेम अपरिमित असतं – पण ते प्रेम समजून उमगण्याइतकं प्रगल्भ असावं लागतं.
तिच्या संसारातलं प्रत्येक वाद, प्रत्येक भांडण तात्पुरतं असतं – जर त्यात तुम्ही पेटवलेली आग नसते तर.
आई म्हणते – “माझ्या काळात आम्ही सहन केलं.”
मग आजच्या काळात मुलींनी तडजोडीचा अर्थ ‘हिणवणूक’ समजू नये.
सहन करावं लागतं, कारण तेच नातं टिकवण्याचा मार्ग आहे.
एक मुलगी जेव्हा माहेरी येते – तेव्हा ती काही वेळासाठी विसावा घेते.
पण आईचं "हे सासर बरोबर नाही", "तो नवरा वाईट आहे", असं म्हणणं तिच्या मनात विष पेरतं –
आणि मग ती परतच जात नाही.
ती संसार सोडते. नवरा गमावते. आणि सगळ्यांत वाईट – स्वतःचा आत्मविश्वास हरवते.
तुम्ही मुलीचं आयुष्य सोडवत नाही – तुम्ही तिच्या भावी आयुष्याचं दरवाजा बंद करताय.
कधी कधी – समजावणं, सोबत देणं, आणि “सहन कर” असं म्हणणं म्हणजे वाईट नसतं.
तर तेच खरं प्रेम असतं.
आई-बापांचे आदर्श म्हणजे वाद मिटवणारे.
तोड लावणारे नाही, तर जोड करणारे.
चूक सासराची असेल, तरही समजून घेतल्या गेलं पाहिजे.
कारण सासर बदलता येईल – पण आयुष्यभरासाठी स्थिरताही गरजेची आहे.
एक मुलगी तिच्या सासरात टिकते – कारण ती समजते.
एक नवरा संसार टिकवतो – कारण तो समजून घेतो.
पण त्या दोघांच्या मध्ये जर कुणी आई-बाप स्वतःचं भूतकाळ घेऊन उभं राहत असेल – तर तो संसार ‘सावली’ होतो.
आजच्या पालकांनी हे समजून घ्या:
तुमचं काम मुलीच्या डोक्यावरून हात फिरवण्याचं आहे, नवऱ्याच्या डोक्यावरून थाप मारण्याचं नाही.
मुलगी रडली की लगेच माहेरी आणणं हे उपाय नाही, तर दोष वाढवणं आहे.
तुम्ही जर नातं तोडण्याच्या बाजूने असाल, तर नंतरचं दुःखही तुमचं आहे.
विचार करा…
का आज नातं टिकत नाही?
का आज मुलगी माहेरी राहणं मोठेपण मानते?
का आज मुलीच्या आईला सासरचं बोलणं कमीपणाचं वाटतं?
तुमच्या लेकीच्या डोळ्यात अश्रू नकोत –
पण तिच्या हातात कायमचा घटस्फोटाचा कागदही नको.
तुमचं प्रेम टिकावू असू द्या –
तुटकं नाही.
हात जोडून विनंती –
तोडण्याआधी जपा, समजून घ्या, आणि वाचा…
घटस्फोट वाचवा, संसार सांभाळा."
#संसार #मायलेकी #घटस्फोट #आईचा_हस्तक्षेप #RealisticMarathi #MarathiTruth #समाजआरसा #स्वानुभव #MarathiSociety #Satyakatha #जागरूकपालक
Comments
Post a Comment