संघर्ष तुझा आहे, पण अपेक्षा सगळ्यांच्या...
आजकालची तरुण पिढी खूप काही सहन करते, पण बोलत नाही.
सगळ्यांना वाटतं, हा मोबाईलमध्ये बिझी असतो, याला काही जबाबदाऱ्या नाहीत,
पण कुणी विचारत नाही – तो खरंच बिझी आहे, की तुटलेला आहे?
बाहेरून सगळं ठिकठाक दिसतं –
स्टेटस अपडेट्स, इंस्टा स्टोरीज, थोडं हसणं, थोडं बोलणं…
पण आतून?
एक मोठी लढाई चालू असते –
स्वतःशी, परिस्थितीशी, समाजाच्या अपेक्षांशी...
आई-बाबा म्हणतात – "आम्हाला तुझं चांगलं पाहायचंय!"
पण "चांगलं" म्हणजे नक्की काय?
सरकारी नोकरी? मोठं पॅकेज? चारचाकी गाडी?
कुणी विचारत नाही – “तुझं मन काय म्हणतं?”
मित्र म्हणतात – "चल धमाल करूया!"
पण पर्समध्ये शंभरच रुपये असले की,
धमाल पेक्षा जबाबदारी आठवते.
भविष्यासाठी वाटचाल करणाऱ्यांना "आज" हरवून चालत नाही.
प्रेम करणाऱ्यालाही एवढी समजूतदारी हवी की,
"तो उशिरा रिप्लाय करतो कारण तो बिझी आहे,
ते दुसरीकडे लक्ष देत नाही – तो फक्त स्वतःचं भविष्य उभारतोय."
म्हणून तरुण पिढीचं हे वास्तव फार खोल आहे –
जे समाजाला दिसत नाही, पण रोज तुटतं.
या जगात फक्त दोनच गोष्टी मिळवणं कठीण आहे –
समजून घेणारा माणूस आणि मन:शांती.
आजचा तरुण पैसा कमावतोय, पण समाधान हरवत चाललाय.
तो यशाच्या मागे पळतोय, पण झोप त्याच्यापासून दूर जात चालली आहे.
तो लोकांना खूश ठेवतोय, पण स्वतःसाठी वेळच उरत नाही.
एक दिवस सगळं मिळेल – नोकरी, पैसा, नाव.
पण तोपर्यंत थोडी साथ हवी, थोडं समजून घेणं हवं,
आणि सगळ्यात जास्त – एक छोटंसं वाक्य हवं…
"तू ठीक आहेस का रे?"
#वास्तवदर्शीलेख #समाजाचाआरसा #तरुणाईचंसत्य #स्वतःशीसंघर्ष #आईवडिलांचीअपेक्षा #माणूसकीम्हणून #मनःशांती #यशाआधीच्यासंधी #MarathiReality #मराठीलेख #StrugglesOfYouth #EmotionalTruth #RealTalkMarathi
Comments
Post a Comment