झगमगाटाच्या पडद्याआडचा अंधार
आपण सर्वजण आपल्या आयुष्यात कुठेतरी संघर्ष करत असतो – काही संघर्ष दिसतात, काही फक्त आपल्या मनात चालत असतात.
परंतु हीच ती पिढी आहे जिथे आपण स्वतःचा संघर्ष झाकतो आणि इतरांचा झगमगाट उघड उघड पाहतो…
आणि नकळत त्या चकाकीच्या तुलनेत आपल्याला स्वतःचीच किंमत कमी वाटायला लागते.
सोशल मीडियावरचा तो परफेक्ट फोटो, स्टोरीजमधली पार्टी, ट्रॅव्हल व्ह्लॉग्स, कपल गोल्स…
हे सगळं खरंच इतकं सुंदर आहे का?
की ते केवळ एका अशा क्षणाचा तुकडा आहे, ज्यामागे अनेक अश्रू, तणाव आणि एकटेपणा लपवलेला आहे?
खरं सांगायचं तर –
कोणत्याही चमकदार चेहऱ्यामागे एक थकलंलेलं मन असतं,
आणि कुठल्याही लखलखाटामागे एकटेपणाचा काळोखा.
आपण आपल्या खाजगी दुःखाची तुलना दुसऱ्याच्या सार्वजनिक सुखाशी करतो,
आणि मग स्वतःला लहान, दुर्बल, गोंधळलेलं किंवा "माझंच का आयुष्य असं?" असा प्रश्न पडतो.
पण ही तुलना कधीच न्याय्य नसते – कारण आपल्याला दुसऱ्याच्या संपूर्ण चित्राचा केवळ एक चमकदार तुकडा दिसतो.
त्या स्टेटसला हजारो लाईक्स मिळाले असतील, पण पोस्ट करणाऱ्याचं मन रात्री उशिरा कुशीत डोकं घालून रडलेलं असू शकतं.
त्या यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास असतो, पण त्याच्या पाठीमागे नाकारल्या गेलेल्या संधींचा खच असतो.
ती सुंदर जोडप्याची छायाचित्रं परिपूर्ण वाटतात, पण त्यामागे अनेक वाद, समजूतदारपणा आणि तडजोडी असतात.
आपण सर्वांनी हे लक्षात ठेवायला हवं –
कोणाचंही जीवन संपूर्ण नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात एक "अदृश्य लढा" चालू असतो.
म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्याशी करत बसू नका –
आपलं दुःख तितकंच खरं आहे, जितकं त्यांचं यश आहे.
आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या वेदनांमधून जाऊनच घडतोय, शिकतोय, आणि हळूहळू स्वतःला समजून घेतोय.
कधीही विसरू नका –
आपली कथा, कितीही अश्रूंनी भिजलेली असो… ती खऱ्या अर्थाने सुंदर आहे.
कारण ती खरी आहे, तुमची आहे, आणि तुमच्या प्रत्येक झगड्याचा साक्षीदार आहे.
#वास्तवदर्शीलेख #खऱ्यायशाचीपाठचिएकटवाट #तुलना_नको_स्वीकृतीहवी #मनाचंआरसादाखवणारा_लेख #अस्सं_खरंखुरं_जीवन #भावनांचीसच्चाई #स्वतःचीकथा
Comments
Post a Comment