भावना विरुद्ध व्यवहार नात्यांचा बदलता चेहरा
"माणूस बदलला की नातंही बदलतं" हे आपण ऐकत आलोय. पण सध्याच्या काळात ही म्हण जणू सत्य सिद्ध होते आहे. माणूस केवळ बदललेला नाही, तर त्याचं नात्यांबाबतचं विचारसरणीचं तत्त्वज्ञानच पालटलं आहे.
पूर्वी नातं म्हणजे जिव्हाळा, आधार, समर्पण आणि भावना असायची. आज नातं म्हणजे सुविधा, गरज, सोयीचा व्यवहार आणि फायदा असं काहीसं झालंय.
भावनिक लोक – जपणारे पण हरवणारे
हे लोक नात्यांमध्ये काहीच अपेक्षा न ठेवता प्रेम करतात.
जे मिळेल त्यात समाधानी राहतात, आणि कायम दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचं सुख शोधतात. पण वास्तव हे आहे की –
या लोकांचं भावनिक दान, अनेकदा स्वार्थी लोकांचं ‘मूल्यहीन वाटणारा खर्च’ ठरतं.
भावनिक लोक वेळ, प्रेम, समर्पण देतात – पण समोरचं व्यक्ती ते समजत नाही, की समजूनही दुर्लक्ष करते.
शेवटी या लोकांना प्रश्न पडतो – "मी एवढं सगळं दिलं... तरी मी एकटाच का उरलो?"
प्रॅक्टिकल लोक – संतुलनात वागणारे
हे लोक भावना आणि व्यवहार यामधला मधला मार्ग निवतात.
त्यांचं नात्याचं गणित स्पष्ट असतं –
"तू मला वेळ दिलास, तर मीही देईन",
"तू उपयोगी ठरलास, तर मी जवळ राहीन".
त्यांना नात्यांची किंमत माहित असते, पण ती भावना म्हणून नव्हे – एक देणं-घेणं म्हणून.
अशा लोकांसोबत नातं ठेवणं सोपं असतं, पण त्यांच्याकडून अधिर प्रेम, आधार, किंवा निस्सीम समर्पण अपेक्षा करणं – चुकीचं ठरतं.
प्रोफेशनल लोक – गरज सरो वैद्य मरो
हे लोक नात्यांकडे Relationship Management म्हणून बघतात.
त्यांचं नातं ही एक डील आहे – "माझं काम तू पूर्ण कर, मी तुझं फोन उचलेन."
कधीकधी अशा लोकांमध्ये रक्ताचं नातं असलं तरीही, त्यांचं वागणं परक्यासारखं असतं.
ते फक्त गरज असेल तेव्हाच आपल्याशी बोलतात, मेसेज करतात, भेटतात. बाकी वेळेस ते आपलं अस्तित्वही विसरतात.
> “नातं असणं महत्त्वाचं नाही, ते 'जपणं' महत्त्वाचं आहे” – ही भावना त्यांच्या शब्दकोशात नसते.
डिजिटल नात्यांची दुनियादारी
आजचा माणूस "Typing…" या दोन शब्दांत अडकून राहिलाय.
आई-बाबा सोबत बोलण्याऐवजी त्यांना फॉरवर्ड मेसेजस पाठवतो.
मित्रांसोबत चहा घेण्याऐवजी ग्रुपवर GIF टाकतो.
आणि जोडीदाराशी वेळ घालवण्याऐवजी 'Last seen' तपासतो.
हे सगळं इतकं "प्रॅक्टिकल" झालंय की "भावना" ही एक कमजोरी वाटू लागली आहे.
नात्यांचं बदललेलं परिभाषा
पूर्वी : "नातं तुटलं की डोळ्यात पाणी यायचं..."
आता : "नातं तुटलं की ‘Unfriend’, ‘Block’, ‘Mute’ केलं जातं."
पूर्वी : "दुरावल्यावर भेट घ्यायची घाई असायची..."
आता : "दुरावल्यावर Status लावून जळवायचं."
कुटुंब, मित्र, जीवनसाथी, गुरु, शेजारी – ही सगळी नाती तुमचं अस्तित्व घडवतात. पण जर आपण त्यांना फक्त गरज म्हणून बघितलं, तर ती नाती एक दिवस "History" मध्ये जाऊन "Memory" म्हणून राहतील.
> भावनांचं मूल्य कधीच पैशाने ठरत नाही. पण पैशासाठी भावना हरवल्या जातात – हेच आजचं वास्तव आहे.
उपसंहार – नातं राखायचं की वापरायचं?
तू कोण आहेस?
भावनिक, जो प्रेमात जगतो?
प्रॅक्टिकल, जो हिशोब ठेवतो?
की प्रोफेशनल, जो केवळ उपयोग पाहतो?
हा प्रश्न स्वतःला विचार.
कारण नातं ही फाईल नाही – ती भावना आहे.
ती उघडली, वाचली, समजून घेतली, आणि मनात जपली पाहिजे.
तुझं नातं टिकवायचं असेल – तर मनापासून जप.
कारण गरज संपली की माणूस नाहीसा होतो,
पण आठवणी मात्र कायम राहतात...
Comments
Post a Comment