त्याची कहाणी कुणी ऐकली आहे का?
आपल्या आजूबाजूला काही लोक कायम गप्प असतात. शांत, संयमी, कुणाच्या वादात न पडणारे, समोरच्याचं ऐकून घेणारे. ते कोणावर चिडत नाहीत, उगाच प्रतिक्रिया देत नाहीत. पण तुम्ही कधी विचार केलाय का – असे माणसे गप्प का असतात?
कदाचित त्यांनी बघितलंय, बोलून काही बदलत नाही.
कदाचित त्यांनी अनुभवलेलं असतं, की जास्त बोलणाऱ्यांना समजून घेणारा कोणी नसतो.
कदाचित त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या जखमा खोल असतात.
गप्प बसणं म्हणजे काहीच न बोलणं नसतं –
तर हजार गोष्टी मनात असूनही न सांगता श्वास घेत राहणं असतं.
असे माणसे दिसायला शांत असतात, पण त्यांच्या मनात रोज वादळं उठत असतात.
कधी घरातून मिळालेली जखम,
कधी आयुष्यात सोबत असूनही आलेली एकटेपणाची जाणीव,
तर कधी समाजाच्या अपेक्षांचं ओझं.
ते सगळं ते गप्प बसून पचवत असतात.
पण समाज काय करतो?
शांत माणसाला दुर्बल समजतो, त्याला गृहीत धरतो.
"याला तर काही फरकच पडत नाही,"
"हा तर नेहमीच गप्प असतो,"
"याला नाही काही भावना!"
अशा टीका, टोमणे, किंवा थट्टा – सगळं त्याच्याकडे फेकलं जातं.
पण हे कोण समजून घेतं की,
कधी कधी गप्प बसणं ही रक्षा असते – आपल्यासाठी आणि समोरच्यांसाठी.
ज्या व्यक्तीला चुकूनही कुणाला दुखवायचं नसतं,
जी व्यक्ती सतत दुसऱ्याच्या सुख-दु:खाचा विचार करते,
ती व्यक्ती जेव्हा गप्प बसते, तेव्हा ती फक्त बोलणं थांबवते,
पण त्याचं मन ओरडत असतं.
ते मनही कधी कधी विचारतं –
"माझंही काही महत्व आहे का?"
"माझं ऐकायला कोणी आहे का?"
"मी एवढा समजून घेतो, पण मला कोण समजून घेतं?"
या माणसाची एकच चूक असते –
तो आपली वेदना बोलून दाखवत नाही.
त्यामुळेच, त्याची वेदना कुणालाही जाणवत नाही.
आणि मग…
हळूहळू तो माणूस खचत जातो.
एक दिवस येतो, जेव्हा त्याचं गप्प बसणं ही सवय नाही, तर त्याचं अस्तित्वच बनतं
म्हणूनच…
जर तुमच्या आयुष्यात असा कुणी असेल – जो नेहमी शांत असतो, गप्प बसतो –
तर त्याला फक्त एकदा विचारून बघा,
"तुझ्या मनात काय चाललंय?"
कदाचित त्याला फक्त तेच हवं असतं –
कोणीतरी एकजण जरी त्याच्या आतल्या आवाजाला ऐकून घ्यावा!
शांत व्यक्ती ही कमकुवत नसते –
ती खूप मोठी ताकद बाळगून असते…
पण ती सतत सिद्ध करून दाखवावी, अशी गरज नाही.
त्याच्या मनाच्या खोलपणाची थोडीशी कल्पना घ्या –
कारण कधी कधी सर्वात गप्प बसलेली माणसे
"सगळ्यात जास्त ओरडत" असतात – फक्त मनात.
#गप्प_बसलेलं_मन
#शांततेचा_आरसा
#RealMarathiThoughts
#EmotionalDepth
#VicharKaruya
#MarathiRealityCheck
#MentalHealthAwareness
#शब्दाशिवायही_माणूस_बोलतो
#InnerBattle
#कळतं_पण_वेदना_नकळत
#ViralMarathiPost
#SamajikAarsa
Comments
Post a Comment