मन थकतं… आणि आपण गप्प बसतो!
सगळं नीट चाललेलं असतं…
म्हणजे दुसऱ्यांच्या नजरेत.
कामाला जातोय, घरी वेळेवर परततोय, फोनला रिप्लाय देतोय, स्माईल देतोय…
पण आतून मात्र… एक सतत चालणारा संघर्ष सुरू असतो — ज्याची कुणालाच जाणीव नसते.
कधी कधी मन इतकं थकतं… की फक्त शांत बसून राहावंसं वाटतं.
बोलायचं नसतं. समजावून द्यायचं नसतं. रडावंसंही वाटत नाही…
फक्त काहीच नकोसं वाटतं.
काही लोक म्हणतात — “डिप्रेशन वगैरे काही नसतं, मनाने थोडं बळकट व्हा.”
हे तेच लोक असतात जे स्वतःचं मन ऐकूच शकत नाहीत…
जेव्हा कुणी म्हणतं, “मला काहीच कारण नाही, पण वाईट वाटतंय”
तेव्हा त्याला 'दुलर्क्ष' करणं हे समाजाचं आजचं वास्तव आहे.
आजही आपल्या समाजात भावना समजून घेणं, त्यांना नाव देणं, त्यांच्या मागची कारणं शोधणं याला फारसं महत्त्व नाही.
आपण भावनांशी लढतो…
त्या स्वीकारत नाही.
म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती सतत हसते, बोलते, खळखट्याक करते —
तेव्हा आपण समजतो, "हे छान आहे यार!"
पण कधी ती व्यक्ती अचानक गप्प होते,
काहीच बोलत नाही, किंवा जरा एकटी राहते…
तेव्हा आपण विचार न करता लगेच म्हणतो, “काय attitude आहे याचा/हिचा!”
आपण विचार करतच नाही की कदाचित ती व्यक्ती थकली असेल… मोडली असेल… कोलमडली असेल.
आपण म्हणतो, “लोक बदललेत...”
पण कधी विचार केला का, का बदलले असतील?
कधीकधी आयुष्य इतकं कठीण करतं की लोक नसूनही बदलतात.
मनाला कधी वाटतं, “माझं कोणीच नाही”
आणि त्या एका क्षणात, एकटं असण्याची सवय लागते.
खरं सांगायचं तर… माणसाला कुणाच्या खांद्यावर रडायला हवं असतं,
पण त्याला विचारलं जातं — "कसली नाटकी करतोस?"
म्हणूनच मग तो रडणं पण बंद करतो.
वाईट दिवस जातात… पण त्यांचं खोल वळख कायम राहातं.
आणि तेच आपल्याला नकळत "मोठं" करतं —
पण त्या वाढीची किंमत फार असते.
आयुष्य हे सुंदर आहे, पण आयुष्याचा एक टोक आहे — जे नुसत्या positive quotes ने ओलांडता येत नाही.
कधी स्वतःच्या माणसांनी डावललं जातं,
कधी वेळेने मारलं जातं,
कधी स्वप्नंच आपल्याला फसवतात.
म्हणूनच,
जर कोणी गप्प आहे, सतत एकटा बसतोय, हसत नाहीये —
तर त्याला “बदलला आहेस” म्हणण्याऐवजी,
एकदा तरी विचार करा — “काय झालय रे?”
कदाचित तुमच्या त्या एका प्रश्नाने,
एखाद्याचा जीव वाचू शकतो!
#मनाचे_खरे_कथन
#वाईटदिवस_संपतात_पण_ओळख_राहते
#भावनिकसाक्षरता
#EmotionalIntelligence
#MentalHealthAwareness
#जगणं_गडबडीतलं_शांतताही_शोधूया
#माणूस_म्हणून_वागूया
#शांत_लोकांची_गडबड_कळू_द्या
#मनातलं_ऐका
#कधी_गप्प_राहणंही_सांभाळणं_असतं
Comments
Post a Comment