मी हरले... पण संपले नाही (भाग ३)
ती एका संध्याकाळी "मायामृग फाउंडेशन" च्या ऑफिसमधून बाहेर पडली.
संध्याकाळचा सूर्य डोळ्यावर पडत होता, आणि एक शांत वाटणारा क्षण तिला क्षणभर सावरून गेला.
तेव्हाच तिच्या मोबाइलवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला.
"तुला वाटतंय तू सगळं मागे टाकलंस...? पण काही गोष्टी अजून जिवंत आहेत."
ती क्षणभर थिजली.
"कोण बोलतोय?" ती विचारणार, तोपर्यंत कॉल कट झाला.
पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच नंबरवरून मेसेज —
"त्या रात्रीचं एक सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहे."
ती घाबरली नव्हती.
पण गोंधळली होती.
ती केस बंद झाली नव्हती का? पोलीस तपास झाला होता. तिची डायरी पुरेसा पुरावा होती.
मग हे फुटेज? कोण आहे हा माणूस?
तिनं ते फुटेज मागवण्यासाठी त्या नंबरवर कॉल केला.
उत्तर आलं —
"तेवढ्यासाठी भेटायला लागेल. एकटंच ये. जुना पोस्ट ऑफिसजवळ."
ती एकटी गेली.
शंका होती, पण भीती नव्हती.
पाठीवर विश्वासाचं बळ होतं.
तेथे एक माणूस उभा होता —
साध्या टी-शर्टमध्ये, पण चेहऱ्यावर एक विचित्र आत्मविश्वास.
"मी त्या फ्लॅटमध्ये त्या रात्री कॅमेरा लावला होता. मी प्रॉपर्टी एजंट आहे. पण खरं कारण — तिथे काहीतरी गडबड चालू होती, म्हणून रेकॉर्डिंग सुरू ठेवलं."
त्याने एक USB दिला.
"हे बघ. तुझ्या म्हणण्यापेक्षा वेगळं काहीतरी घडलंय."
ती घरी आली. लॅपटॉप सुरू केला.
USB जोडली.
ती फुटेज पाहू लागली…
आणि मग…
त्या फुटेजमध्ये ती स्वतः दिसत होती —
ड्रिंक घेताना नाही… तर कोणाच्यातरी ग्लासमध्ये काहीतरी मिसळताना.
तिचं डोकं गरगरलं.
"हे मी नाही… हे कोणी एडिट केलंय… की मला कोणी वापरलं?"
तिला आठवायला लागलं…
त्या रात्री ती फक्त एकदा काही सेकंद एकटी होती —
कोणी तिच्या सारखं कपडं घालून तिचं रूप धारण केलं?
किंवा…?
संदीप, तिचा साथीदार, तिला म्हणाला —
"तू कोणावरही विश्वास ठेवू नको. हा सगळा काही प्लॅन असू शकतो. तू एका चळवळीचा चेहरा झाली आहेस. तुला खोटं ठरवण्यासाठी काहीही होऊ शकतं."
ती चक्रावली होती.
NGO मध्येही काही संशयास्पद हलचाली दिसू लागल्या.
एका मुलीनं गुपचूप सांगितलं —
"ताई, इथे काही नवीन लोक आलेत, जे वारंवार तुमच्या लॅपटॉपजवळ जातात."
तिनं पुन्हा त्या USB मधलं फुटेज प्रोफेशनल तज्ज्ञाकडून तपासायला दिलं.
त्यांचं उत्तर —
"हे व्हिडिओ एडिटेड आहे. पाच सेकंदाचं फ्रेम shift केलं आहे."
कोणी तिच्या बदनामीसाठी मुद्दाम हे करत होतं.
पण का?
आणि आता एक नवा प्रश्न तिच्या समोर होता —
"कोण आहे, जो मला पुन्हा गप्प करायचं बघतोय?"
भाग ४ साठी कमेंट करा
#marathistory #inspiration #स्त्रीशक्ती #reality #truthoflife #mentalhealth #मराठीकथा #संघर्ष #स्त्रीकथा #मराठीmotivationalstory
Comments
Post a Comment