मी हरले... पण संपले नाही (भाग ८)

राधा आता फाईल्स, क्लिप्स, कोडवर्ड्स, मेल्स याच्या मागे धावत होती… पण आता तिला हवं होतं प्रत्यक्ष सत्य.
तिच्या डोळ्यांसमोर सतत फिरणारा मेघाचा व्हिडीओ… तिच्या डोळ्यांमधला भेदरलेला पण जिवंत प्रकाश…

“ते मला पुन्हा मेघा बनवू देणार नाहीत… पण राधा, तुजमध्ये जी पेट आहे, तीच मला जिवंत ठेऊन आहे.”

राधाने अनेक NGOs, सायबर लोकांना विचारणा केली – शेवटी एका मानसी नावाच्या तंत्रज्ञ मुलीने तिला सांगितलं:

“हा व्हिडीओ real-time encrypted आहे. मेघा अजून जिवंत आहे – आणि तो क्लिप एका re-education zone मधून आहे – जिथे अशा लोकांना ठेवतात जे सिस्टमच्या गोष्टी बोलायला लागतात.”

राधाच्या अंगावर काटा आला.

तपासाअंती एक लोकेशन मिळतं – Bharuch, Gujarat.

राधा एका NGO च्या नावाने तिथे जाते, आणि एक फार जुनं, पण सुरक्षेच्या जाळ्यांनी वेढलेलं स्थान बघते.

ते एक Mental Rehabilitation Camp म्हणून नोंदलेलं होतं – पण त्यातले आवाज, आतून येणारे श्वासांचे झंकार… वेगळंच काहीतरी सांगत होते.

ती एका परिचारिकेच्या मोबाईलमध्ये तीच क्लिप दिसते — मेघा रुग्णाच्या कपड्यांत.

राधा समजते —
"तिला जिवंत ठेवण्यात आलंय… पण तिची ओळख पूर्ण मिटवली गेलीय!"

ती तिला भेटू शकत नाही… पण ती एक छोटी चिट्ठी तिच्यापर्यंत पोचवते:

"तूच माझा आवाज आहेस. पण मीच तुझं भविष्य आहे. तुझा मार्ग जितका खरं बोलतो, तितकाच धोकादायक आहे."

TruthTapes वर आता एक नवीन शो सुरू झाला –
नाव: “RAKHT PUNYA: Real Women. Fake Victims?”

या शोमध्ये प्रत्येक बाईच्या कथेची खिल्ली उडवली जात होती.
अभिनेत्री घेऊन खोटे व्हिडीओ बनवले जात होते.
Project Svayam वर तीव्र हल्ला होता —
लोक म्हणत होते, "राधा म्हणजे मानसिक भिकारींची देवी!"

पण राधा शांत होती. कारण तिने आता एक live trap सेट केला होता.

TruthTapesच्या टीममध्ये आरव परत गेला होता —
आणि तोच राधाचा भोंगा होता आता.

त्याने एक सिस्टीममध्ये "backup server" install केलं –
TruthTapesचे सर्व इंटरनल मेल, टेप, भ्रामक क्लिप्स, पैशांचे व्यवहार — सगळं बाहेर येऊ लागलं.

राधाने एक Instagram LIVE सुरू केलं.
अचानक लाखो लोक पाहू लागले.

तिने एका फाईलने सुरुवात केली –
"माझ्या टीममधून गद्दारी झाली, माझ्यावर खोटं लावलं,
पण हे बघा — याच TruthTapes च्या स्टुडिओतून ७ खोट्या क्लिप्स शूट झाल्या… आणि ही त्यांची behind-the-scenes footage."

सगळे स्तब्ध.

पुढे ती म्हणाली:

“सत्यास वेष बदलावा लागतो, पण त्याचा प्रकाश अंधाराला चिरतोच.”

LIVE दरम्यान, एक नवीन चेहरा स्क्रीनवर आला —
"Hi Radhika..."
तो मयंक होता.

त्याने स्वतःच्या सिस्टीमवरून बोलणं सुरू केलं:

“तू जिंकशील असं वाटतं का?
या देशात लोकांना फक्त मसाला पाहिजे – कोण खरा आणि कोण खोटा हे त्यांना माहीत नसतं.
म्हणूनच, जिथं सत्य असतं, तिथं आवाज दबतो.”

पण त्याचवेळी, राधाच्या एका मित्र पत्रकाराने, TruthTapes वर IT Raid सुरू केली.

LIVE मध्येच त्या ऑफिसचे दारे फोडली गेली, हार्ड डिस्क जप्त झाली.
TruthTapesचा प्रसार संपला… पण लढा अजूनही शिल्लक होता.

#marathistory #inspiration #स्त्रीशक्ती #reality #truthoflife #mentalhealth #मराठीकथा #संघर्ष #स्त्रीकथा #मराठीmotivationalstory


Comments

Popular Posts