बदलत्या काळात हरवतीये ती... संस्कारांची 'आई'

कधी काळी घराचं मंदिर होतं, आई होती, वडील होते, वडीलधारी मंडळी होती... आणि सगळ्यांचं मोल होतं. आता घरात आहे – टीव्ही, नेटफ्लिक्स, फूड डिलिव्हरी, मोबाईल... आणि 'मी माझं पाहते' म्हणणारी एक पिढी.

सांस्कृतिकतेचा पाया जर कुणी घट्ट रोवला असेल, तर ती होती आपली आई – जिच्या पदरात पाणी नव्हतं पण मानेवर संस्कार होते. पण आता पदर राहिला नाही, ओढणी शोल्डरवर झुलतेय... आणि संस्कार? त्या मोबाईलच्या 'रिल्स'मध्ये स्क्रोल होतायत.

🔻 आयटी क्षेत्रात यशस्वी झालेल्या मुली आता स्वतंत्र झाल्यात. पण...

1991 नंतर आलेलं ग्लोबलायझेशन, आयटी क्रांती, मुलींचं शिक्षण, करिअर यानं महिलांनी जबरदस्त झेप घेतली. हे अभिमानाचं आहे. पण समस्या तेव्हा सुरू झाली जेव्हा स्वातंत्र्याला ‘स्वैराचार’ समजलं गेलं.

आई-मुलीचं नातं ‘मैत्री’मध्ये बदललं, पण त्या मैत्रीत आई 'आई' राहिलीच नाही... ती 'मैत्रीण' बनली आणि संस्कारांचं उत्तरदायित्व कुठेतरी हरवलं.

रात्री परतायचं वेळ नाही, विकेंड कसा साजरा करते विचारलं तर वडील मागासलेले ठरतात. घरात हॉटपॅंट, बाहेर पार्टी, आणि स्वयंपाकघर ‘स्विग्गी’वर आउटसोर्स केलंय. वडिलांच्या नजरेत शरम आहे, पण आई म्हणते – "हेच तर आधुनिकतेचं लक्षण आहे!"

🔻 सासर-माहेर ही आता ‘बॅटल ग्राउंड’ झालंय...

मुलगी माहेरी मोठं झाल्यावर तिची आई सासरकडचं गणित शिकवते – "तू काही कमी नाहीस, तुझ्या पगारावर घर चालू शकतं, तुच खरं बोल, वाकू नको!"

आणि मग नवऱ्याचं बोलणं – "आईला विचारून घेते", "आईला काय वाटेल?" अशा वाक्यांनी त्याच्या मातृत्वाला नकार दिला जातो. नवरा ‘मुलगा’ बनतो, आणि सासरच्या मंडळींचा तिरस्कार सुरू होतो.
सगळं काही "माझा नवरा आणि माझं स्वातंत्र्य" या दोन शब्दांत अडकतं. बाकी घर, घरचं आपलेपण... नुसता 'फॉर्मॅलिटी'!

🔻 लग्न म्हणजे आता सहजीवन नव्हे, तर शो ऑफ...

तीन बायकी डान्स, एक इंस्टाग्राम रील, आणि दोन महागड्या पोशाखातले फोटो – हाच लग्नाचा मूळ उद्देश उरतोय.
पार्टनर निवडताना 'किती पॅकेज आहे?' हा पहिला प्रश्न, आणि संसारात थोडासा संघर्ष आला, की 'घटस्फोटाचं काय?' हा पहिलाच विचार.

"मुलगा नामर्द होता" असं म्हणताना आई-मुलगी बिनधास्त असतात. पण हाच पुरुष जेव्हा बायकोच्या आईची ढवळाढवळ झेलतो, तेव्हा बोलायलाही कोणी उरत नाही...

🔻 सांस्कृतिक पराभव आईच्या नजरेतून...

आई स्वतःचा पती गहाण टाकून लेकीला थ्री बीएचकेचा नवरा हवा म्हणते, कारण... स्वतःचं न जगलेलं स्वातंत्र्य मुलीतून जगायचंय!
माहेरी दारात दुचाकीही नव्हती, पण जावई फॉर्च्युनर मध्ये यायला हवा... हे तिला 'प्रगती' वाटते.

फोडणीचा भात खाणारी आई, आता मुलीच्या ओट्यावर इंस्टंट पास्ता पाहतेय आणि अभिमानाने हसतेय.

🔻 काही तरी चुकतंय... आणि खोलवर चुकतंय.

महिलांचा विकास झाला आहे. पण या विकासाने कुटुंबसंस्था मोडते आहे, संस्कृती विरून चालली आहे, आणि स्त्रीचा खरा सन्मान हरवतो आहे.

आजची स्त्री घर चालवू शकते, हे खरं... पण तिच्या हातून घर तुटत नये, ही जबाबदारी तिचीच आहे.

स्वातंत्र्य हवंय, पण बिनधास्तपणा नव्हे. प्रेम हवंय, पण वडिलधाऱ्यांवरचा राग नव्हे. दृढ मत हवंय, पण अति-आत्ममग्नता नव्हे.

👉 स्त्रीने स्वतःचा अभिमान जपायलाच हवा... पण संस्कृती विसरून नाही.

✍️ संसार म्हणजे तडजोड, प्रेम, संयम आणि आपुलकी. विवाह संस्था ही फक्त कायदेशीर कागदपत्र नाही, ती भावनिक गुंतवणूक आहे.
तुमच्या ‘फ्रीडम’च्या नादात जर वडील, पती, सासर, घर यांचं अस्तित्व हरवू लागलं, तर तुमचं आयुष्य 'स्वतंत्र' होईल... पण 'रिकामं'.

 बदल हवाच – पण मूल्यांच्या आधारावर.

जेवढा अभिमान तुमच्या शिक्षणाचा आहे, तेवढाच अभिमान तुमच्या आईच्या पिढीच्या त्यागाचाही असायला हवा.
जेवढं स्वातंत्र्य तुमचं आहे, तेवढंच मान सासूच्या मताचंही असायला हवं.

#संस्कृती_नव्हे_तर_विकृती
#आई_म्हणजे_संस्कार
#सासर_म्हणजे_शत्रू_नाही
#स्वातंत्र्य_होतंय_स्वैराचार
#घरपण_सांभाळूया
#स्त्रीसन्मान_संस्कारांसह
#संसार_नसतो_स्पर्धा
#थोडं_थांबूया_थोडं_विचार करूया
#आईची_शिक्षा_महत्त्वाची
#भावनांची_ही_पिढी_हरवतेय

Comments

Popular Posts