स्वतःसाठी ठाम रहा

कधी कधी आपण वाट पाहतो 
की आपलं चांगुलपण कुणाच्या तरी डोळ्यांत उतरावं,
आपला खरेपणा कुणाच्या हृदयाला भिडावा,
आपली मदत कुणाचं जीवन उजळावं.

पण वास्तव हे सांगतं…
माणसं बदलतात.
परिस्थिती बदलते… आणि
स्वार्थ समोर आला की आठवणींचं वजनही हलकं होतं.

आज अनेक नात्यांमध्ये एक गोष्ट दिसते "प्रामाणिकपणा कमतरताचं लक्षण समजला जातो."

जो मनापासून बोलतो, तो मूर्ख ठरतो.
जो निस्वार्थ मदत करतो, तो फसतो.
जो प्रत्येक वेळेस समोरच्याला सावरतो, त्यालाच शेवटी टाकून दिलं जातं.

काय चुकतं त्याचं?
कधीच काही नाही.

त्याचं फक्त एक चुकतं 
त्याने स्वतःच्या तत्त्वांवर तडजोड केली.

म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा
माणसं क्षणात आपलेपण दाखवतात आणि क्षणात अनोळखी होतात.
त्यांच्या बदलण्यावर तुमचं तत्त्व अवलंबून असेल, तर तुम्हीही हराल.

नातं असेल तर प्रामाणिकपणा असावा,
नसेल तर स्पष्टपणा असावा.

खोटं हसणं, खोटं बोलणं,
सतत समजून घेणं, समोरच्याच्या गैरवर्तनाला दुर्लक्ष करणं…
हे सगळं तुम्ही चांगुलपणा म्हणून करत असाल,
पण ते समोरच्याला हक्क वाटायला लागतं, आणि मग तुम्हाला दुखावलं जातं.

स्वतःच्या किमती लक्षात ठेवा.

तुमच्या आयुष्यात एक गोष्ट पक्की करा 
मदत तेव्हाच करा, जेव्हा समोरचा प्रयत्न करतो आहे.
ज्याला स्वतःच्या आयुष्याची किंमत नाही,
त्याच्यासाठी तुम्ही रात्रभर जागून काय करणार?

त्याला अनुभव होऊ द्या,
त्याला भूक लागू द्या,
त्याला पायाला खरचटू द्या…
मगच तो पुढे जाईल.
नाहीतर त्याच्याच वाईट वेळेला तुम्ही जे आधार दिलात,
त्या आधाराचं तो एक दिवस उपहास करेल.

तुम्हीही कधी ना कधी वाईट वेळेतून आलेले असता.

तेव्हा कुणी समजून घेतलं नव्हतं,
तरीही तुम्ही चालत राहिलात.
मग आज इतरांचं वाईट पाहून पाय लटपटू द्या,
मन भरून येऊ द्या…
पण तुमच्या मूळ तत्त्वांवर तडजोड करू नका.

"माणूस जाणार आहे…
पण तत्त्व टिकली पाहिजेत."

स्वतःच्या मूल्यांवर उभं राहिलात तर वेळेनं दिलेलं प्रत्येक उत्तर तुमच्याच बाजूने येईल.

#नाती_की_तडजोड
#भावना_आणि_बुद्धी
#माणसं_बदलतात
#वास्तव_समाजाचा
#मराठीलेख
#मुल्यांची_किंमत
#मनगाठ
#स्वतःवर_विश्वास
#तुमची_ओळख_तुमच्याच_मूल्यांवर

Comments

Popular Posts