मी हरले... पण संपले नाही (भाग ५)
तिच्या हातात उरलेला एकच दुवा होता — जान्हवीचा कॉल.
तिनं त्या नंबरवर ट्रू-कॉलर, सायबर ट्रेसिंग आणि नेटवर्क रेकॉर्ड वापरून तपास सुरु केला.
तीचा मोबाइल हॅक झाला होता. पण एक संदर्भ सापडला — "रामगड – फार्महाऊस नं. ७"
ती कोणाला काही न सांगता, त्या पत्त्यावर पोहोचली.
रामगडच्या एका दुर्गम भागात असलेलं ते फार्महाऊस, बाहेरून एकदम सामान्य दिसत होतं.
आत गेल्यावर — सर्वत्र सिसिटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक डोअर लॉक, आणि एका खोल रूममधून येणारी कुजबुज.
राधा एका खिडकीतून डोकावते —
तीथे चार मुली बंदिस्त, त्यांच्यासोबत एक मुलगी — डोक्यावर पांढऱ्या पट्ट्या, चेहरा सूजलेला… पण आवाज ओळखीचा…
जान्हवी!
तेवढ्यात एका माणसाचा आवाज आला —
"तिला परत जाऊ देऊ नका. ती ‘त्यांच्यापर्यंत’ पोहोचणार नाही पाहिजे."
राधा मागे वळली आणि थक्क झाली —
तो माणूस मयंक नव्हता… तर तिचा जुना कॉलेज फ्रेंड — "समीर!"
समीर — जो तिला कॉलेजमध्ये मदतीचा हात देत होता, पत्रकारितेची दिशा दाखवत होता,
तोच या सगळ्या नेटवर्कचा "ऑन-ग्राउंड ऑपरेटर" होता?
"तू खरं शोधायच्या नादात चुकीच्या भुयारात उतरलीस राधा…"
तिला तिथेच बंद केलं गेलं.
ती जान्हवीच्या बाजूला होती. त्या खोलीतून बाहेर एकटं निघणं अशक्य होतं.
मात्र राधा गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हती.
तिनं खोलीच्या कोपऱ्यात असलेल्या एक जुन्या CCTV वायर्सचा वापर करून मोबाईल नेटवर्क सिग्नल हॅक केला.
ती तिच्या लॅपटॉपवरचा एक सिक्रेट बॅकअप लिंक ॲक्टिव्ह करत म्हणाली:
"मी गप्प बसेन, पण आधी समाज बोलायला लागेल."
त्या रात्री 'TruthTapes' चा नवा भाग जगासमोर गेला.
लाइव फुटेज. बंदिस्त मुली. समीरचा चेहरा. जान्हवीची अवस्था.
त्या व्हिडिओनं स्फोट घडवला.
राधा अजून बंदिस्त होती… पण आता ती एकटी नव्हती.
देशभरात याचिकांचे वादळ उठलं. सोशल मीडियावर तिचं नाव #SpeakLikeRadha म्हणून ट्रेंड होऊ लागलं.
राधा एका बंद खोलीत.
भिंतीवर कुजलेला पंखा, जळलेला वायरींगचा वास, आणि ती व जान्हवी – दोघी निर्विकार, शांत.
जान्हवी डोळे उघडते आणि म्हणते:
"त्यांना वाटतं की आपण कळसू शकत नाही. पण मला आठवतं… समीर एका रात्री म्हणाला होता — 'TruthTapes तुझ्यासाठी नव्हे, आमच्यासाठी निर्माण झालं.' "
राधा दचकली.
"म्हणजे?"
"तू एक साधन होतीस. एक माध्यम. त्यांनी तुला वापरायचं ठरवलं होतं."
जान्हवीने सांगायला सुरुवात केली —
TruthTapes हा एक Double-Agent प्रोजेक्ट होता.
अर्थात: राधाला वाटत होतं की ती समाजासाठी सत्य उघडतेय, पण तिच्या प्रत्येक तपासणीला कोणीतरी सवयीने ट्रॅक करत होतं.
ती ज्या केस उघड करत होती, त्या ‘खुल्या’ होऊनही काही होत नव्हतं — कारण त्या मागेच तीच टीम होती जी या घटना घडवत होती.
TruthTapes मधून जनता खेचली जात होती, पण यंत्रणा तेच ठेवत होते.
राधा हादरली.
"मग मी?"
जान्हवी म्हणाली —
"तू खरी आहेस. पण त्यांनी तुझ्या भोळ्या आगीचा वापर केला."
जान्हवीनं सांगितलं —
ती फक्त या रॅकेटमध्ये अडकलेली पीडित नव्हती, तर एक जुन्या गुन्हेगारी नेटवर्कमध्ये माहिती पुरवणारी ‘फॉर्मर इन्फॉर्मर’ होती.
ती राधाला काही महिन्यांपूर्वी भेटली तेव्हा तिचा हेतू होता — TruthTapes वापरून ‘मोठी मंडळी’ उघड करणं.
पण तीच माहिती TruthTapes च्या मूळ गटाकडे पोहोचली — आणि जान्हवी गायब.
आता त्यांचा टार्गेट राधा होती.
TruthTapes मागे होते काही ‘नामांकित सामाजिक संस्था’, काही ‘राजकीय हितसंबंध’, आणि एक मिडिया हाऊस — जे आपल्याच अँकरकडून बातम्या ‘डिझाईन’ करून दाखवत होतं.
त्यांचा मुख्य हेतू होता — जनतेचं लक्ष खऱ्या प्रश्नांवरून हटवणं, आणि समाजात ‘नाट्यमय’ उद्रेक घडवून आणणं.
राधाच्या प्रत्येक फुटेजमुळे जनमत तयार होत होतं —
पण त्याचा शेवटी फायदा कोणाला होणार, हे तीला माहीत नव्हतं.
जान्हवीने तिच्या साठी एक लॅपटॉप दडवून ठेवला होता. त्या संगणकात होती — मोठ्या लोकांच्या कॉल रेकॉर्ड्स, ईमेल्स, डिजिटल मनी ट्रेल्स, आणि काही जिवंत फाईल्स.
राधानं तो लॅपटॉप हातात घेतला आणि एक फाईल उघडली –
"Project Janvedh - Psychological Manipulation Log"
ते वाचून ती हादरली.
TruthTapes हा प्रकल्प फक्त लोकशाहीचं सत्य नव्हतं, तर जनतेच्या भावनांचं नियोजन करणारा एक सायको-डिजिटल प्रकल्प होता —
जनतेला चीडवून, राग दाखवून, विरोध करून मग तेच ‘क्लिक’ करून त्यांची आकडेवारी विकणं.
त्या रात्री अचानक दरवाजा उघडतो.
एक उंचसर व्यक्ती, काळा मास्क घातलेला, रिव्हॉल्व्हर हातात.
तो समोर येतो… आणि मास्क काढतो.
"मयंक!"
राधा किंचाळते.
मयंक तिच्याकडे बघत शांतपणे म्हणतो:
"तू खूप पुढे गेलीस राधा. पण तुझ्या इतक्या सच्च्या आवाजाचा उपयोग आम्हालाही होता. आता… गेम संपतो."
पण तितक्यात…
गोळी आवाजाऐवजी फटाफट क्लिक्स…
दारामागे होते सीबीआयचे दोन अधिकारी — जान्हवीने सिक्रेट ट्रॅकर अॅक्टिव्ह केला होता.
TruthTapes च्या खऱ्या चेहऱ्याचं उलगडणं सुरु झालं.
पण जनतेला अजूनही कळालं नाही — की राधा जिंकलिये की हरणार?
एका एनजीओमध्ये मुलींना शिकवत बसलेली राधा, आता एक नवा प्रकल्प घेऊन उभी होती —
"Project Svayam" —
जिथे ‘सत्य केवळ दाखवलं जात नाही, तर तपासलं जातं, पडताळलं जातं… आणि निव्वळ आवाज नव्हे, तर कृती घडवली जाते."
भाग ६ साठी कमेंट करा
#marathistory #inspiration #स्त्रीशक्ती #reality #truthoflife #mentalhealth #मराठीकथा #संघर्ष #स्त्रीकथा #मराठीmotivationalstory
Comments
Post a Comment