आपण ऐकतो खूप, पण समजून घेतो किती?

"आपलं म्हणणं ऐकून घ्यावं, ही सवय झाली आहे आपल्याला...
पण आपण कोणाचं ऐकतो का?"

संपर्क असतो, पण संवाद हरवलेला असतो...
घर असतं, पण त्यात ‘घरपण’ हरवलेलं असतं...
आप्त असतात, पण नात्यांमधली ऊब हरवलेली असते...

कधी वाटतं, आपण नात्यांना फक्त नाव देतो, पण अर्थ देत नाही.
आई-बाप फक्त जबाबदारी, जोडीदार म्हणजे फक्त साथीदार,
मुलं म्हणजे स्टेटस सिंबॉल आणि वृद्ध म्हणजे 'ओझं'.

कोणी घरात बोललं तर चिडचिड होते,
कोणी शांत राहिलं तर ‘काय झालंय?’ असा संशय घेतो.

आपल्या वेळेची किंमत असते,
पण दुसऱ्याच्या वेळेला आपण “काय काम नाही का त्याला?” असं म्हणतो.

गाडी वर आली की पादचारी फालतू वाटतो,
आणि रस्ता ओलांडताना गाड्या धावत असतील तर सगळे ‘बेशिस्त’ वाटतात!

आपण चुकलो तरी ‘परिस्थितीमुळे झालं’,
पण इतरांनी चूक केली की ‘ते माणूसच वाईट आहे’ असं म्हणतो...

आपण शिकतो खूप, पण समजून घेतो खूप कमी!
वाढत चाललेली महागाई, पण माणुसकीचं मोल मात्र घसरलेलं…

आज भांडणं मिटवण्यासाठी कुणी पुढे जात नाही.
कारण लोक “स्वतःहून गेला म्हणजे चुकलाच” असं मानतात.
माफ करणं आता कमकुवतपणाचं लक्षण समजलं जातं,
मग सुटणं सोपं वाटतं आणि जपणं अवघड!

जगण्याच्या स्पर्धेत आपण एवढं धावत सुटलोय,
की घरातली नजर चुकवणारी नजरही आता लक्षात येत नाही.
मुलं फोनमध्ये, आईवडील टी.व्ही. मध्ये,
आणि जोडपं वॉट्सअॅपच्या थंब इमोजीत हरवलंय…

आज जे नातं तुमचं आहे, ते उद्या असेलच याची शाश्वती नाही…
कारण काळ थांबत नाही, आणि आठवणी परत येत नाहीत…

म्हणून…

बोलून घ्या, जिथे अजूनही संवादाची शक्यता आहे

धरून ठेवा, जिथे अजूनही जपण्याची जागा आहे

आणि सोडून द्या, जिथे तुम्हाला फक्त त्रासच मिळतो आहे…

कारण आयुष्य हे एकट्यालाच जगायचं नसतं…
ते शेअर केलं तरच खरं अर्थ गवसतो…
नाहीतर कित्येक जन आयुष्यभर ‘संपर्कात’ असतात,
पण ‘एकटे’च मरतात…!

#समाज #नातेसंबंध #माणूसपण #शब्दांमागच्याभावना #मराठीविचार #वास्तवदर्शीलेख #समाजआरसा #मनाचेगुज #मनोगत #lifequotes #marathiwriter #मराठीसाहित्य #स्पर्शकरणारेशब्द #आयुष्य #sachikahani #जागरूकता #jyotinimbalkar

Comments

Popular Posts