प्रेम – आता केवळ विरंगुळा?
कधी काळी प्रेम म्हणजे समर्पण होतं,
आता ते केवळ 'attention' मिळवण्यासाठीच वाटतं.
एक काळ होता...
जिथे प्रेमात विरहही पवित्र वाटायचा.
आता मात्र, दुरावा झाला की लगेच नवा “chat” सुरू.
"आता प्रेमाला खोलपणा नाही, फक्त हजेरी आहे."
काही अपवाद वगळता –
शहरी आणि खेड्यातलंही प्रेम आजकाल
काही दिवसांचं प्रोजेक्ट वाटतं.
थोडं भांडण झालं,
थोडं मनाविरुद्ध झालं,
की लगेच "breakup".
तडजोड हा शब्द
जणू नवीन पिढीच्या शब्दकोशातून गायबच झालाय.
"प्रेमाचं मोल संपलं, मनोरंजनाचं साधन झालं!"
हल्ली प्रेमात "विचार" नाही,
"विचार करणं" कमी झालंय.
Feelings पेक्षा filters महत्त्वाचे.
साथ पेक्षा status महत्त्वाचा.
connection पेक्षा convenience महत्त्वाचं.
त्यामुळेच नातं जपायचं असं वाटत नाही,
संपलं की दुसरं मिळेल या विचाराने प्रेम shallow झालंय.
"दुरावा आता त्रास देत नाही, कारण backups तयार असतात."
पूर्वी नातं तुटलं की माणसं तुटायची,
आता नातं तुटतं…
पण दोन तासात दुसरं match भेटतं dating app वर.
त्या व्यक्तीची जागा दुसरा घेतो,
आणि आपण म्हणतो –
"move on झालोय..."
पण खरंतर –
"move on" नाही होत, फक्त cover up होतं.
"समजून घेणं म्हणजे मागे झुकणं नाही!"
आधीच भांडण होऊ नये म्हणून लोक तडजोड करायचे,
आता भांडण झालं की "seen" करून ignore केलं जातं.
समजून घेणं कुणालाच जमत नाही,
प्रत्येकाला हवं असतं –
"माझं म्हणणं तू ऐक."
तिचं म्हणणं त्याला कळत नाही,
त्याचं दुःख तिला जाणवत नाही.
"प्रेम आता संबंध नाही, तर व्यस्त वेळेतलं विरंगुळं वाटू लागलंय."
जेव्हा प्रेमात commitment पेक्षा
"available आहेस का" हाच महत्वाचा प्रश्न होतो,
तेव्हा नात्याचं पावित्र्य हरवतं.
नातं टिकवण्यासाठी संघर्ष करण्याऐवजी,
नवं नातं शोधणं सोपं वाटतं...
हेच वास्तव आहे –
आजच्या नात्यांमध्ये गोडवा आहे, पण खोलपणा नाही.
लाखो chat आहेत, पण एकही खरी "feeling" नाही.
"प्रेमाला पुन्हा माणूसपण द्या!"
हेच सांगावंसं वाटतं की –
प्रेमात स्वार्थ नको.
तडजोड ही कमजोरी नाही, ती नातं टिकवण्याची ताकद आहे.
समजून घेणं ही कला आहे, जी आजची पिढी विसरत चालली आहे.
प्रेम करा…
पण टिकवण्यासाठी करा,
सुटवण्यासाठी नाही.
#प्रेमाचं_पिढीतलं_रूपांतर
#ShallowLoveReality
#समाजआरसा
#तडजोड_म्हणजे_कमजोरी_नाही
#DigitalLoveReality
#BreakupToBackup
#PremNavheProject
#ModernLoveTrap
#EmotionalMirror
#PremSamjunGhe
#खरंप्रेम_दुर्मिळझालंय
आटोपशीर पण परफेक्ट
ReplyDelete