नातं तुटतं तेव्हा फक्त दोन माणसं रडत नाहीत, अनेक आयुष्यं मोडतात…

लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन.
पण केवळ शरीराचं नव्हे प्रेमाचं, विश्वासाचं, आणि जबाबदारीचं.
जेंव्हा दोन माणसं लग्न करतात, तेंव्हा त्यांचं नातं फक्त एक करार नसतो… ते एक वचन असतं आयुष्यभर साथ देण्याचं, जपण्याचं, समजून घेण्याचं.

पण आज या जगात, लग्न ही "सोय" वाटायला लागली आहे. आणि म्हणूनच अनेक नात्यांच्या खोल पायथ्याला फाटलेली विश्वासाची वीण दिसतेय.

विवाहबाह्य संबंध समाजाने जणू स्वीकारलेली एक नविन आधुनिक कीड!

जेव्हा एखादा नवरा किंवा बायको आपला जोडीदार न ठेवता, दुसऱ्या व्यक्तीकडे वळतो, तेव्हा प्रश्न फक्त "अन् फेअर रिलेशनशिप"चा नसतो तो प्रश्न असतो,
"का झालं हे?"
"कुणी कमी दिलं का?"
"की आपणच कमी समजून घेतलं?"

विवाहबाह्य संबंध फक्त शरीराच्या गरजांपुरता मर्यादित असतो का?
नाही! तो संबंध मनाशी, भावना, आणि तुटलेल्या अपेक्षांशी असतो.
कधी संवाद कमी पडतो, कधी समजूत, कधी फक्त थोडं "ऐकून घेणं"…

खरं प्रेम, ते टिकवणं, ते समजून घेणं, खूप कठीण काम आहे.
दुसऱ्या कोणाकडे वळणं ही सोपी वाटणारी पण दीर्घकाळ परिणाम करणारी चूक असते.

विवाहबाह्य संबंधात काय हरवतं?

👉 स्वतःवरचा आत्मविश्वास

👉 जोडीदाराचं अख्खं भावनिक जग

👉 मूलांचं बालपण आणि त्यांचं ‘आईबाबा’वरचं श्रद्धास्थान

👉 समाजातलं स्थान

👉 आणि सर्वात महत्वाचं… स्वतःची शुद्ध.


कधी कधी फक्त "कुणी ऐकत नाही" म्हणून आपण कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करत असतो.
दुसऱ्या व्यक्तीकडून मिळणारी सहानुभूती, आकर्षण, मदत ही सगळी "क्षणिक" असते.
पण त्याचे परिणाम "आयुष्यभराचे" असतात.

कोणतंही नातं परिपूर्ण नसतं.

प्रत्येक जोडपं भांडतं, रागावतात, अबोला धरतात पण त्यातून संवाद करून बाहेर येणं हेच खरं प्रेम असतं.
मुलांचे लहान प्रश्न, रोजचे खर्च, मानसिक थकवा… हे सगळं समजून घेणं हेच एकमेकांप्रतीचं खरं योगदान आहे.

विवाहबाह्य संबंध ही "स्वतःच्या कमतरतेची" कबुली असते.

ते कोणावरही दोष टाकण्याची वेळ नसते ती स्वतःशी प्रामाणिक होण्याची वेळ असते.

तुमच्या नात्यात काही कमी वाटत असेल, तर बोलून काढा.
समजून घ्या, गरज असल्यास थेरपी घ्या, संवाद करा
पण नातं फसवू नका… तो "फसवणूक" आहे चुकीचं आहे आणि नैतिक, भावनिक, कायदेशीरदृष्ट्याही घातक आहे.

"विश्वास गमावणं ही चूक असते, पण तो पुन्हा मिळवणं अशक्य असतं…"

प्रेम मिळवणं सोपं असतं, पण ते जपणं हीच खरी माणूस म्हणून घेतलेली कसोटी आहे.
कधी फक्त एक वाक्य पुरेसं असतं: "तू असशील, तर बाकी सगळं जमेल."

#वास्तवदर्शीलेख #मराठीविचार #मराठीसंवाद #marathiwriter #समाजआरसा #marathimotivation #विवाहबाह्यसंबंध #marathiquotes #नातं #marathilekh #समजूत #विश्वासघात #बदल #अर्थपूर्णनाती #मराठी #भावनांचा_विचार

Comments

Popular Posts