माणूस आज आजाराने नाही, विचाराने संपतो आहे...

आजचा माणूस थकत आहे — पण ही थकवा अंगाला नाही, मनाला आलेली आहे.
शरीराने नाही, विचारांनी खचलेली माणसं आज आपल्याच आजूबाजूला फिरत आहेत.
बाहेरून सगळं व्यवस्थित दिसतं — ऑफिस, मोबाईल, गाड्या, हसणारे चेहरे, सेल्फी, स्टेटस...
पण आतून? आतून एक रिकामपण आहे — खोल, काळोख्या खड्ड्यासारखं.

एक काळ होता, जेव्हा लोक दुखावले की कुणाकडे जाऊन मोकळं होत. आज माणूस इतका एकटा पडलाय की त्याला स्वतःजवळ मोकळं व्हावं लागतं.
त्याचं "कसं आहेस?" कोण विचारत नाही, आणि तो स्वतः "ठीक आहे" म्हणत राहतो... रोज... दररोज...

आज तुम्ही कुणालाही विचाराल की “कस आहेस?”, उत्तर येईल – “बेस्ट”...
पण खरंतर आत एक गोंधळ सुरू आहे...
स्वतःच्याच विचारांचं वादळ, अपयशाचं दुःख, यशामागची धावपळ, नात्यांमधलं ताणतणाव, आणि न सुटणाऱ्या अपेक्षा...

हे मानसिक थकव्याचे आजार कुठेही दिसत नाहीत, पण ते आत खोलवर शिरलेत.

- झोप आहे पण विश्रांती नाही
- लोक आहेत पण संवाद नाही
- काम आहे पण समाधान नाही
- हसू आहे पण आनंद नाही
- सगळं आहे... पण मनात खूप काही हरवलं आहे...

कधी हे सगळं घरच्या जबाबदाऱ्या म्हणून, कधी समाजाच्या दबावाखाली, कधी कोणीतरी ‘काय म्हणेल’ याच्या भीतीपायी — आणि कधी फक्त एवढंच कारण की "आपल्याला थांबायला परवानगीच नाही..."

हे थकलेले मन, जे दिवसभर वावरणारं असतं, ते रात्री उशाला डोकं टेकवलं की प्रश्न विचारतं :

“हे असंच चालणार आहे का?”
“कोणी खरंच माझं ऐकणार आहे का?”
“हे सगळं करताना मी ‘मी’ राहिलोय का?”

पण या सगळ्या प्रश्नांना आपण गप्प बसून उत्तर देतो — कारण जगाला उत्तर हवं असतं, तक्रार नाही.

🤍 मनाचं आरोग्य सांभाळा...

माणूस एकदा तुटला की त्याला पुन्हा जुळवणं कठीण होतं.
त्यामुळे फक्त शरीरासाठी नाही, तर मनासाठीही वेळ द्या... संवाद साधा... ऐका... आणि स्वतःला समजून घ्या.
कारण विचारांमुळे थकलेली माणसं, आज जगात सर्वात जास्त आजारी आहेत...

शेवटी...

"मन नाजूक असतं... तुटत नाही, पण गप्प राहतं... आणि जे गप्प राहतं, ते एक दिवस कायमचं निघून जातं..."

#वास्तवदर्शीलेख #मराठीमन #मानसिकथकवा #मनाचंआरोग्य #सत्यकडेखोलपणे #मनाचा आवाज #EmotionalTruth #StressInLife #MarathiReality #MarathiThoughts #मनोगत #MentalHealthAwareness #MarathiDeepQuotes #SocialMirror #एकटेपणाचीसाथ #MarathiRealLife

Comments

Popular Posts