स्त्री, तुझा आत्मसन्मान मोबाईलच्या स्क्रीनपेक्षा मोठा आहे!

दोन मिनिटं...
फक्त दोन मिनिटं शांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा, डोळे मिटा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा 
"मी जी आहे, ती खरंच 'लाइक'साठी आहे का?"

आजकालच्या डिजिटल युगात स्त्री शिक्षित झालीय, स्वतंत्र झालीय...
पण काहींच्या मोबाईलमधल्या 'इनबॉक्स'मध्ये ती अजूनही वाट पाहणारी, स्वप्नाळू, चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणारी एक 'रिक्वेस्ट' बनून राहिली आहे.

सोशल मीडियावर प्रत्येक 'हाय' मागे एक उद्देश लपलेला असतो.
प्रत्येक कमेंट ‘मस्त दिसतेस गं…’ ही कौतुक नाही, ती सुरुवात असते एका जाळ्याची…
आणि अनेक स्त्रिया, प्रेमाच्या भुकेपोटी, समजूतदार नवऱ्याच्या दुर्लक्षामुळे किंवा नात्यांमधल्या तुटवट्यामुळे, या जाळ्यात अडकतात.

"तुझं DP अफलातून आहे गं..."
फक्त DPवरून जिवाभावाचं नातं तयार होतं का?

"माझं मन गुंतलंय तुझ्यात..."
मन गुंततं की हुकूम लावतात?

"तुला आयुष्यभर साथ देईन..."
आयुष्यभराचा शब्द फक्त 2 मिनिटांच्या ‘टायमपास’साठी दिला जातो?

खरंच विचार करा

आपण किती वेळा त्या व्यक्तींचा 'रिअल आयडेंटिटी' पडताळून पाहिलंय?

त्यांनी सांगितलेली 'सिंगल स्टेटस' खरी आहे याची खात्री कुठून?

आपण जे बोलतो, ते स्क्रीनवरच राहतं का?

नाही!
ते तुमच्या संसारात येतं.
ते तुमच्या नवऱ्याच्या विश्वासात फूट पाडतं.
ते तुमच्या मुलांच्या भविष्यावर सावली टाकतं.

स्त्रियांनो...

तुमचं सौंदर्य तुमचं आत्मसन्मान आहे.
तो 'व्ह्यूज', 'लाइक', 'कॉमेंट्स' मध्ये मोजू नका.

तुमचं दुखणं समजून घेणारे अनेक लोकं तुमच्या घरातच असतात पण आपण संवाद बंद केल्याने, परके जवळचे वाटू लागतात.

लक्षात ठेवा

सोशल मीडिया ही एक जागा आहे, आयुष्य नव्हे.
जो तुम्हाला एकटं पाहून जवळ येतो, तो सावरायला नाही तर गाफील करत उध्वस्त करायला येतो.
👨‍👩‍👧‍👦 तुमचं कुटुंब, नवरा, मुलं हेच तुमचं खरं विश्व आहे.


आज हजारो महिला आपल्या संसाराची राख उचलतायत…
फसवणूक झाल्यावर रडतायत…
मुलांचं भविष्य हातातून जाताना पाहतायत…

तेव्हा हा लेख एक थांबा देतो 
"कुठे चालली आहेस, गं... हे खरंच तू होतीस का?"

शेवट

प्रेम हवंय?… मिळेल.
आदर हवा?… मिळेल.
कोणीतरी ‘विशेष’ हवंय?… घरातच आहे.

पण त्या सोशल मीडियाच्या अंधारात, स्वतःचा 'खरा चेहरा' गमावून बसू नकोस.

#महिला_साक्षरता #सोशलमीडिया_भान #नाती_जपा #स्त्री_सन्मान
#मराठीलेख #स्त्री_आत्मभान #RealisticMarathiPost #DigitalSammelan
#SocialMediaAwareness #MarathiMotivation #WomensDignity
#सावधराहात #नात्यांचेसंवर्धन #MarathiLifeLesson
#EmotionalReality #RespectWomen #मुलींसाठीजागरूकता

Comments

Popular Posts