पलटी – एक पुनर्जन्मभाग २
न्यायालयाच्या पहिल्या तारखेला सगळ्या मीडिया हाऊससमोर ती उभी होती. केस म्हणजे केवळ जय विरुद्ध अदिती नव्हती – ही पैशाच्या सत्तेविरुद्ध सत्याची लढाई होती.
वकिलाने विचारले:
"तुम्ही ब्लॉग लिहिला, मुलींचे अनुभव शेअर केले, पण पुरावा कुठे आहे की त्यांच्यावरही अत्याचार झाला होता?"
अदिती शांतपणे म्हणाली:
"माझा शब्द पुरावा नाही का?
का फक्त पुरुषांचं खरं मानायचं?"
त्या दिवशी तिला कोर्टात गप्प बसवायचं ठरवून आलेले लोक चुकचुकले.
कोर्टात एका दिवस अचानक एक नवा वकील तिला भेटला रितेश सोमाणी, सुप्रीम कोर्टात केस लढणारा, पण स्त्री अधिकारांसाठी लढणारा.
"अदिती, तू माझ्यासारख्या लोकांसाठी एक प्रकाशझोत आहेस. मी केस तुझ्यासाठी लढणार!"
त्या दिवशी पहिल्यांदा तिच्या डोळ्यांत भयाऐवजी विश्वास होता.
जयच्या बापाने त्याला जामिनावर सोडवण्याचा प्रयत्न केला. कोर्टात वकिल बोलला,
"हा तर प्रतिष्ठित व्यक्तीचा मुलगा आहे. समाजात बदनामी होईल."
रितेशने उत्तर दिलं:
"अरे पण अदितीचं काय? तिच्या आयुष्याची बदनामी कुणी भरपाई करणार?"
कोर्टात सन्नाटा. पहिल्यांदा कोणीतरी पीडितेच्या बाजूने ठाम उभं राहिलं होतं.
रोजच्या भेटींमध्ये अदिती आणि रितेशची एक वेगळी केमिस्ट्री तयार झाली. दोघेही गडद भूतकाळाचे, पण उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणारे.
एक दिवस रितेश तिला म्हणाला,
"अदिती, तू माफ करू शकतेस का जयला?"
ती हसली. थोडा वेळ गप्प राहिली.
"मी माफ करणं नाही शिकली,
पण माझ्या दुःखाचं साम्राज्य मीच मोडून टाकलं… त्याचंही मोडेन!"
एक दिवस अचानक एक सीडी सापडली. त्यात जयच्या पाठीमागे असलेला माणूस दिसतो
'मंत्री आत्माराम पाटील', जयचा काका, जो मानव तस्करीचा रॅकेट चालवत होता.
सगळा खेळ उलटला!
अदितीला फक्त न्याय नाही हवा होता संपूर्ण सिस्टीमचं भांडाफोड.
अदिती LIVE जाते – #सत्यकडूनसर्जनकडे
तिने फेसबुक/YouTube LIVE मध्ये स्पष्ट सांगितलं:
“माझं चारित्र्य फाटलेलं नाही...
फाटलेली आहे ही व्यवस्था…
जी अत्याचार सहन करायला शिकवते!”
लोकांच्या अश्रूंपेक्षा मोठं शस्त्र नसतं जनता रडली, पण आता उठलीही!
शेवटी?
जयला जन्मठेप.
मंत्री आत्माराम पाटीलचे पुरावे बाहेर.
अदिती आता राज्य महिला आयोगाची सदस्य.
या कथेचा दररोज एक भाग आपल्या पेज वर व ब्लॉग टाकली जाईल जर कथा आपल्या आवडली तर आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका
Comments
Post a Comment