लग्न म्हणजे नातं, सौदा नव्हे
आजची तरुण पिढी शिक्षित आहे, आत्मनिर्भर आहे, इंटरनेटच्या असीम जगात पोहोचलेली आहे. पण या डिजिटल युगात एक गोष्ट मागे पडते आहे ती म्हणजे "नात्यांची खोल समज, त्यागाची तयारी आणि आपुलकीची भान."
मुलगा असो की मुलगी प्रत्येकाची एक स्वतंत्र ओळख असतेच, पण माणूस म्हणून एकत्र जुळणं हे खूप महत्वाचं आहे.
लग्न ठरवताना काय पाहिलं जातं?
➤ मुलगी दिसायला सुंदर आहे का?
➤ मुलगा किती पगार मिळवतो?
➤ गाडी, घर, बँक बॅलन्स आहे का?
➤ ‘स्वतंत्र’ राहू शकतो का?
हे पाहणं गैर नाही… पण केवळ याच निकषांवर दोन माणसांचं आयुष्य ठरत असेल, तर ते सुखी होणार नाही.
कुठे हरवलंय नात्यांचं खरंखुरं तत्वज्ञान?
❌ "माझं घर वेगळं हवं."
❌ "तुमच्या आई-वडिलांशी मला संबंध नाही."
❌ "मी कमावते, कोणालाही जवाब देणार नाही."
❌ "हे माझं आयुष्य आहे, तू मला बदलू नकोस."
हे वाक्य आजकाल रोज ऐकायला मिळतात.
लग्न म्हणजे दोन अहंकारांची स्पर्धा नाही, ती दोन अंतरंगांची समजूत आहे.
शून्यातून सुरू झालेली पालकांची वाटचाल आज आपल्या पायाशी ठेवलेली असते पण आपण त्यांच्याकडे पाहण्याऐवजी त्यांना सोडून देण्याची तयारी करतो.
आई-वडिलांनी, नातेवाइकांनी, समाजाने पिढ्यानपिढ्या एक नात्यांची रचना तयार केली आहे.
लग्न ही त्या रचनेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.
पण आज प्रत्येक मुलगा किंवा मुलगी लग्नाच्या नावाखाली "माझ्या आयुष्याचं मी ठरवणार" या विचारात इतके गुरफटलेत की एकत्र कसं राहायचं, सहजीवन म्हणजे काय हे शिकण्याची कोणालाच इच्छा नाही.
आजच्या मुली शिकलेल्या आहेत, कमावत्या आहेत, त्यांना निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे.
ते स्वागतार्ह आहे. पण त्याचवेळी कुटुंब, सासर, सासूबाई, पती, भावजयी, सण-समारंभ, जबाबदाऱ्या, समजून घेणं, राग समजून घेणं, हे सगळं गैर का वाटतंय?
एकीकडे स्वातंत्र्याची आरास असताना दुसरीकडे एकटेपणाची भिंत उभी राहते आहे.
त्यात अनेक संसार मोडत आहेत, नाती तुटत आहेत, आणि मानसिक आरोग्यावर प्रचंड परिणाम होत आहेत.
लग्न करताना मुलीला वन बीएचके घर, गाडी, पगार पाहिजे हे योग्य आहे.
पण त्या मागे असलेली मानसिकता बघा "मला हे हवंय, मिळालंच पाहिजे!"
आई-वडीलांच्या आयुष्यभराच्या कष्टांवर एक दिवसात फुली मारून, "त्यांना वेगळं करा, मगच लग्न करू" हा अट्टहास काय दाखवतो?
मुलगा एका आईचा आधार आहे. तो आईसाठी 'शेवटचा मुलगा' असेल, पण तुझ्यासाठी पहिला पती आहे!
त्याच्या मुळाशी जात, त्याच्या आयुष्यात तू सहभागी हो, मालकीण नाही.
एक शहाणी विनंती
➡ घरं नवीन असली तरी विचार जुने हवेत.
➡ स्वतंत्र मत असो, पण संवादाने नाती जपा.
➡ शिक्षण असो, कमाई असो, ती घर जपण्यासाठी असावी, नातं मोडण्यासाठी नव्हे.
➡ विवाह हा समारंभ नाही, संकल्प आहे तो निभावणं हेच खरे यश!
हक्काने नव्हे, प्रेमाने जपलेली माणसं आयुष्याचा खरा आधार ठरतात.
#वास्तवदर्शीविचार #मराठीलेख #नात्यांचीजपणूक #संसारसंस्कार #MarriageCrisis #DivorceReality #ModernSanskar #मराठीसंस्कार #संवादमहत्त्वाचा #मराठीमन
Comments
Post a Comment