जे गेले ते गेले… पण जे आहेत त्यांना गमावू नका!

आपल्या आयुष्यात अनेकजण येतात… काही हसवतात, काही रडवतात, तर काही फक्त "क्षणभरासाठीच" थांबतात.
काही नाती नशिबाने जुळतात, काही आपण जपतो… आणि काही नजरेसमोर असूनही हळूहळू हरवत जातात.

पण जेव्हा कोणी आपल्याला सोडून जातं, तेव्हा मन त्या क्षणात अडकून बसतं. पुन्हा पुन्हा तोच प्रश्न छळतो "का गेलं?"
आणि मग सुरू होतो स्वतःला छळण्याचा एक मानसिक प्रवास त्याने असं का केलं, मी काय कमी केलं, मी कुठे चुकलो…?

पण सत्य इतकंच की, जे गेले, ते परत येणार नाहीत.
ते फक्त आठवणीत राहतात…
आणि आठवणी कधीच नात्यांना पुनर्जीवित करू शकत नाहीत.

म्हणूनच महत्वाचं असतं जे आज आपल्या आयुष्यात आहेत, त्यांना समजून घेणं, त्यांना वेळ देणं, त्यांच्यासोबत ‘असणं’!

कारण अनेक वेळा आपण हरवलेल्यांसाठी रडत असतो,
पण आपल्यासाठी जीव ओतणाऱ्या माणसांकडे पाहायलाही विसरतो.

मनाच्या वळणावर मागे पाहताना, अनेक क्षण खुणावतात…
पण जीवनाचं खऱ्या अर्थानं नावच आहे पुढे चालत राहणं!
स्वतःला सांभाळत, चुकांपासून शिकत, नात्यांना नव्याने समजून घेत…

आज जे आपल्यासोबत आहेत,
कदाचित उद्या नसतीलही.
मग पुन्हा हीच खंत राहील 
"ते होते, पण मी त्यांना जपलं नाही…"

म्हणून, जीवनाचं सगळ्यात सुंदर सत्य हेच आहे 
जे गेले, त्यांना माफ करा…
जे आहेत, त्यांना सांगा “तुम्ही माझ्यासाठी खास आहात!”

#वास्तवदर्शीलेख
#मनगर्भविचार
#नाती_आणि_माणसं
#भावना_आणि_सत्य
#हरवलेले_क्षण
#जगणं_म्हणजे_स्वीकारणं
#मराठीमन
#संदीपचव्हाणशैली
#मनाच्या_वळणावर

Comments

Popular Posts