जे माणसं काळजी करतात, त्यांचं आपण काय केलं?

कधी खूप विचार करत बसतो आपण 
"माझ्यासोबत आज कोण आहे?"

पण खऱ्या अर्थाने विचार करायला हवा तो प्रश्न असा असतो 
"जे माझ्यासाठी होते, त्यांचं मी काय केलं?"

ती एक व्यक्ती 
प्रत्येक वेळेला आपल्यासाठी फोनवर तासन्तास वाट बघणारी…
आपण तिला "पुढे कॉल करतो" म्हणत थांबवतो.
ती काळजी करत राहते, आणि आपण फक्त ‘seen’ करतो.

तो एक मित्र 
जो कितीही गडबडीत असला तरी "ये ना, थांबतो तुझ्यासाठी" म्हणतो…
आणि आपण… त्याच्या सोबतच असणं विसरून जातो.

ती आई 
रोज विचारते, "सकाळी उठला का? जेवलास का? थकलास का?"
आणि आपण तिला त्रासदायक समजून म्हणतो,
"आई, please! adult झालोय मी आता!"

प्रेम, काळजी, आणि आपुलकी या गोष्टी 'loud' नसतात. त्या शांत असतात.
पण दुर्लक्षित केल्यात ना, की त्या एक दिवस 'शांतपणे' निघून जातात… कायमच्या साठी.

हक्काचा गैरवापर हेच दु:ख.
ती माणसं आपल्यासाठी खूप काही करत राहतात.
आपल्या मूडवर त्यांचं दिवस ठरत असतो.
आपल्याला काही वाटत नाही तेव्हा तेच डोळ्यांत पाणी धरून,
"ठीक आहे, तू आनंदी असलास म्हणजे झालं"
असं म्हणत बाजूला सरकतात.

पण… ते सुद्धा मनुष्य असतात, दगड नाहीत.
त्यांचाही थकवा असतो, त्यांच्याही भावना असतात.

एक दिवस, ते बोलणं बंद करतात.
ते फोन करणं थांबवत नाहीत ते 'शिकून' जातात थांबायला.
ते रडत नाहीत ते 'संवेदना गिळतात'.
ते दूर जातात… शांतपणे.

आणि आपल्याला वाटतं 
"कधी बदलले ते?"

ते बदलत नाहीत… ते ‘ठरवतात’ की स्वतःला कमी लेखणाऱ्या जगात स्वतःचं मोल शोधावं.

तेव्हा मग आपण Instagram ला चिकटून status टाकतो 
"Some people don’t deserve your energy..."
पण सत्य हे असतं 
आपण त्यांच्या प्रेमाच्या लायकीचेच नव्हतो.

नात्यांना गृहीत धरू नका.
हक्क घेतलात, तर तो जपावा लागतो.
काळजी करणारी माणसं एक दिवस थांबणं शिकतात… आणि मग 'स्वतःवर' प्रेम करताना, आपल्याला विसरतात.

तेव्हा त्या माणसांना वेळेत ओळखा.
कधी “Thank you”, कधी “माफ कर”, कधी फक्त “मी आहे तुझ्यासाठी” एवढंच पुरेसं असतं.

#खरंप्रेम #गृहीतधरणं #भावनांचीकिंमत #नात्यांचीकदर #मनगांठ #realrelations #वास्तवदर्शीलेख #जिव्हाळा #emotionaltruth #मराठीलेख #खोलमनाचा #hearttouchingwriting #जगण्याचंखरं

Comments

Popular Posts