कधी कधी स्वतःचीच खूप आठवण येते…
कधी बसल्या बसल्या एक सर्द श्वास येतो… आणि त्याच्यासोबत आठवतो एक जुना ‘मी’.
तो मी…
जो खळखळून हसायचा,
ज्याला वाटायचं की आयुष्यात खूप काही करायचं आहे…
ज्याचं मन स्वप्नांनी भरलेलं होतं,
आणि डोळ्यात एक वेगळीच चमक होती.
पण आज?
आज आरशात पाहिलं, तर चेहरा तोच आहे, पण डोळ्यांत जिवंतपणा हरवलाय.
स्वप्नं अजूनही आहेत, पण ती अजूनही “उद्यापासून” सुरू करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
आणि आत एक आवाज सांगतो
"मी हरवतोय…"
कधी एकटी बसलेली ती मुलगी असते
जिच्या कॉलेजमध्ये खूप स्वप्नं होती.
आज ती घर, जबाबदाऱ्या, संसार, आणि ‘लोक काय म्हणतील’ यामध्ये इतकी अडकलेली की
तिला आठवतच नाही शेवटचा वेळ कधी स्वतःसाठी हसली होती.
कधी तो मुलगा असतो
ज्याला लिहायचं होतं, वाचायचं होतं, मोकळं जगायचं होतं.
आज तो बसतो 'target meet' करत, Excel भरत, आणि WhatsApp group mute करत.
आयुष्य चालतंय… पण "आपण" कुठे आहोत, हे कळेनासं झालंय.
खरंतर आपण हळूहळू बदलत गेलो नाही…
आपण हळूहळू हरवत गेलो.
आधी स्वप्न टाळलं,
मग ते लाजलं,
शेवटी ते गप्प झालं.
जगाच्या हिशोबात आपण बिझी होतो,
पण स्वतःच्या मनाच्या world map वरून आपण गायब झालो.
कधी आई-बाबांनी सांगितलं
"काय करतोस रे, काही स्थिर नाही अजून!"
कधी मित्र म्हणाले
"आजकाल फारच शांत झालास!"
कधी ऑफिस म्हणालं
"तुझं best अजून बाकी आहे!"
पण…
"माझं best तेच होतं जे मी हरवलंय!"
माझं best हे कधीच career graph मध्ये नव्हतं,
ते होतं
कवितांमध्ये, रात्रभर जागण्यात, रस्ता तुडवत भटकण्यात, आणि स्वतःशी गप्पा मारण्यात…
आज मी एक यशस्वी प्रोफेशनल आहे…
पण ते जुनं, वेडं, वेगळं, आणि खरं 'मी'
तो एखाद्या कोपऱ्यात कुडकुडत पडलेला आहे.
त्याला ना ‘promotion’ हवंय, ना ‘salary hike’…
त्याला फक्त थोडा वेळ हवा आहे… माझ्याशी.
कधी थांबा. शांत बसा. आरशात बघा आणि स्वतःला पुन्हा भेटा.
कारण जगात सगळं गमावलं तरी चालेल…
पण स्वतःचा "स्वतःवरचा विश्वास" गमावला, तर आयुष्य अपूर्ण राहतं.
कधी कधी स्वतःचीच खूप आठवण येते… कारण, "स्वतःसारखा सोबती दुसरा कोणीच नाही!"
#स्वतःचीओळख #वास्तवदर्शीलेख #भावनांचीकिंमत #हरवलेलीमी #मनाचीकविता #माझंस्वप्न #marathiwriting #emotionalmarathi #realme #माझंअसणं #माझ्यामना #hearttouchingwriting #innerjourney
Comments
Post a Comment