संपत्ती, संबंध आणि संवेदना हरवलेली माणुसकी

आजच्या या कलयुगी काळात माणूस संपत्तीच्या मागे इतका अंधपणे धावत आहे की त्याच्या नजरेतून ‘माणूस’ ही संकल्पनाच गळून गेली आहे. एक वेळ होती, जेव्हा घरात कमी पैसे असले तरी मनामध्ये भरपूर प्रेम असायचं… पण आज घरात भरपूर पैसे आहेत, पण मनं कोरडी आहेत.

आई-वडिलांची किंमत मोबाईलच्या रिचार्जइतकीही नाही राहिली.
आजची पिढी स्वतःच्या सुखासाठी आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकते आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या स्टेटसवर “Family is everything” असं लिहिते. ही दु:खद विसंगती पाहून प्रश्न पडतो हे आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत?

पत्नी-पतिसंबंधही आता “देणं-घेणं” यावर टिकले आहेत.
जेव्हा प्रेम नाही, संवाद नाही… तेव्हा संसार फक्त दोन लोकांच्या एकत्र राहण्याचं नाव उरतं. पैसा असेल तर प्रेम दाखवलं जातं, पैसा गेला की एकमेकांशी बोलणंही बंद. हे नातं की व्यवहार?

स्त्रिया आज आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्या, पण त्यांना देखील समाज ‘प्रॉपर्टी’ म्हणून पाहतो.
काही पुरुष स्त्रियांकडे पाहतात तेव्हा त्यांना फक्त शरीर दिसतं, भावना नाहीत. ते प्रेम करतात नाही, फक्त हक्क गाजवतात… अशा मानसिकतेने आज स्त्रियांना 'शरीर' म्हणूनच पाहिलं जातं, 'व्यक्ती' म्हणून नाही.

संपत्तीची भूक इतकी वाढली आहे की, माणसं आपल्या आई-वडिलांनाही संपत्तीसाठी फसवतात.
बांधकाम, जमीन, बँक खातं या सगळ्याचं नियोजन करताना एकच विचार "माझ्या नावावर कसं येईल?" आणि हे करताना नात्यांचा घात होतो हे त्यांना कळतच नाही.

शेवटी, आपल्याकडे भरपूर पैसा, मोटारी, मोठं घर असलं तरी जर घरात प्रेम, आपुलकी, संवेदना, आणि एकमेकांबद्दल आदर नसेल… तर ती संपत्ती एक दिवस "शाप" ठरते.

#वास्तवदर्शी_लेख #माणुसकी_हरवलीये #समाजाचा_आरसा #नात्यांचं_मोल #कलयुगाचे_प्रभाव #MarathiThoughts #RealisticWriting #मनातील_महाभारत

Comments

Popular Posts