मिळवणं आणि हरवणं यामधली पोकळी...
कधी विचार केला आहे का, आपण का इतका धावतो? का इतकी धडपड करतो?
एक वस्तू, एक स्वप्न, एक व्यक्ती... जी आपल्या आयुष्यात नसते
पण तरीही तिच्यासाठी आपण जीव ओततो.
कारण ती गोष्ट “हवी” असते... आणि माणूस हेच शिकतो हवं ते मिळवायचं.
पण वास्तव हे असतं की, हवं ते प्रत्येक वेळी मिळेलच असं नाही.
कधी कधी आपण इतका वेळ, मेहनत, भावना खर्च करतो की, आयुष्याचं एक मोठं पान त्या एका गोष्टीसाठी वाचून जातं.
पण अखेर... ती गोष्ट, ती व्यक्ती, ती संधी आपल्याकडून निसटते.
शून्य हाती.
तिच्यासाठी आपण जे काही केलं, त्याची किंमत कोणीच करत नाही.
आणि सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे ती व्यक्ती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते.
त्याला आपण म्हणतो "असण्याची जाणीव नसणे."
हे सगळं अनुभवताना माणूस एक दिवस स्वतःलाच सांगतो:
"जाऊ दे, नाहीच हवं आता. मी खूप प्रयत्न केले."
म्हणजे खरंच सोडून देतो का आपण?
नाही...
आपण स्वतःची समजूत काढतो.
मनाला समजावतो.
जणू आपल्याला त्याची गरज नव्हतीच.
कारण 'हसून जगणं' आपल्याला 'विचार करत जगण्यापेक्षा' सोपं वाटायला लागतं.
या प्रक्रियेत माणूस मोठा होतो.
वास्तव स्वीकारायला शिकतो.
स्वतःला समजायला शिकतो.
आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठे थांबायचं, हे शिकतो.
तुम्ही जर अशा एखाद्या गोष्टीसाठी धडपड केली असेल आणि आज त्या गोष्टीशिवाय जगत असाल,
तर स्वतःवर अभिमान बाळगा.
कारण तुम्ही प्रयत्न केले.
जगाला दाखवून दिलं की,
"मी हरलो नाही, मी फक्त स्वीकारलं."
#वास्तवदर्शीमनोगत #स्वतःचीओळख #मनाचंसांगणं #स्वतःवरअभिमान #मराठीलेख #जगण्याचीशिकवण #धडपडआणिस्विकार #EmotionalTruth
Comments
Post a Comment