मौनाच्या पलिकडे...

कधी कधी आपण इतकं काही गिळून टाकतो की, शब्दच शिल्लक राहत नाहीत. फक्त डोळ्यांत एक थांबलेलं पाणी आणि ओठांवर थरथरती शांतता उरते. नातं वाचवण्याची किंमत अनेकदा 'स्वतःला विसरणं' असते. आणि ही किंमत खूपच महाग असते.

एखाद्या क्षणी आपण आपल्या मनाच्या खोल कप्प्यात असलेल्या असंख्य प्रश्नांना गप्प बसायला सांगतो "का बोलली असं?", "का समजून घेतलं नाही?", "का तिने/त्याने मला ऐकून घेतलं नाही?"

हे सगळं मनातच ठेऊन आपण हसतो. कारण त्या हसण्यामागे एकच आशा असते हे नातं संपू नये.

आपण गप्प राहतो, कारण आपल्याला माहीत असतं बोलून काही बदलणार नाही. उलट, बोलल्यावर जे आहे तेही हातातून निघून जाईल. आणि मग आपल्याला एक नव्हे, तर दोन गोष्टी गमवाव्या लागतील एखादं नातं आणि स्वतःची शांती.

कधी कधी आपल्या मौनाला समजून घेणारी व्यक्ती नसते, पण आपल्याला माहित असतं की आपण फक्त रागावलेलो नाही, तर दुखावलेलो आहोत. राग हा व्यक्त होतो, पण दुःख मात्र मौनात झाकून ठेवावं लागतं.

प्रेम असो, मैत्री असो किंवा घरचं एखादं नातं नात्यांची खरी परीक्षा ही गैरसमजांतून जाते.
तिथं तुम्ही गप्प राहिलात, तर तुम्ही हळवा म्हणवला जाता. बोललात, तर उद्धट.

पण खरं काय असतं माहितीये? तुमचं मौन हे तुमच्या भावनांचं संरक्षण असतं.

माणूस एकटे पडतो, तेव्हा नाही दुःखी होत... तो तेव्हा दुःखी होतो जेव्हा स्वतःसाठी कुणीतरी उभं राहील ही अपेक्षा ठेवतो आणि समोरून फक्त नीरव शांतता मिळते.

शेवटी, आयुष्य शिकवतं प्रत्येक नातं जपण्यासारखं नसतं, आणि प्रत्येक मौन कमकुवतपणाचं नसतं.
कधी कधी मौन हे प्रेमाचं सर्वोच्च रूप असतं जे बोलूनही कधीच समजावता आलं नसतं.

#मौनाचे_सामर्थ्य
#वास्तवदर्शीलेख
#मराठीलेख
#नात्यांचा_आरसा
#शब्दांच्या_पलीकडचे_मौन
#भावनांचा_आवाज
#मूकप्रेम
#मनातलं_सत्य
#नात्यांची_किंमत
#दुखःआणि_शांती
#RealisticMarathi

Comments

Popular Posts