मालकीचा भ्रम...

माणूस जन्मत: रिकाम्या हाताने येतो आणि मृत्यूनंतरही रिकाम्याच हाताने निघून जातो. पण आयुष्यभर "हे माझं आहे", "तो माझा आहे", "ती जमीन माझी आहे", "ते घर माझं आहे" असा अहंकार मिरवत जगत राहतो.

आजकाल माणूस एका छोट्याशा 1BHK फ्लॅटचा मालक होतो, आणि स्वतःला "सम्राट" समजतो. त्याला वाटतं, "हे घर, ही गाडी, हा पैसा सर्व काही मी मिळवलंय!"
पण तो विसरतो की या साऱ्याच गोष्टी फक्त काळजीपूर्वक ठेवलेली कर्जं आहेत त्यावर ना त्याचा पूर्ण हक्क आहे, ना तो कायमस्वरूपी त्याच्याजवळ राहणार आहे.

 "७/१२" वर नाव लिहिलं म्हणजे जमिनीचा मालक होता येत नाही...
कारण अखेरीस, ती जमीन ही "पृथ्वीची आहे", निसर्गाची आहे, काळाची आहे!"
माणूस फक्त काही वर्षांचं भाडेकरू आहे.

❝कितीही संपत्ती मिळाली, तरी अखेरीस शेवटचा प्रवास एका पांढऱ्या कापडात... आणि ६ जणांच्या खांद्यावर होतो.❞
तिथं ना बँकेचं बॅलन्स जातं, ना गाडी, ना बंगला, ना जमीन, ना सोनं  फक्त कर्म, आठवणी आणि आपली माणुसकी आपल्या मागे राहते...

म्हणून "माझं" असं म्हणताना थोडं थांबा...
कारण देव हसत असतो, आणि म्हणतो 
"अरे, वेड्या माणसा... तू काय घेऊन आला होतास आणि काय घेऊन चाललायस? मला सगळं माहीत आहे!"

#वास्तवदर्शी_लेख
#समाजाला_आरसा
#मालकीचा_भ्रम
#माणुसकी_महत्वाची
#LifeRealityMarathi
#MarathiThoughts
#DeepMarathiQuotes
#SpiritualAwakening
#TemporaryOwnership
#7_12चा_सत्य

Comments

Popular Posts