नात्यांची गाठ... नजरेच्या स्पर्शातून
नग्नतेचा संबंध फक्त शरीराशी असतो, पण प्रेमाचा संबंध मनाशी...
कधी कधी दोन माणसं एकमेकांना स्पर्श करत नाहीत, पण तरीही ते इतकं खोलवर जोडलेले असतात की त्यांच्यातला 'स्पर्श' नजरेच्या एका क्षणातूनच होतो...
ती बोलत नाही, पण तिची नजर सांगून जाते की ती रुसलेली आहे...
तो ओरडत नाही, पण त्याचं शांत राहणं ओरडून सांगतं की तो तुटलेला आहे...
आपल्याला वाटतं की नातं टिकवायला रोजच्या भेटी, फोन किंवा
'I Love You' म्हणणं गरजेचं आहे... पण खरं नातं टिकतं "समजून घेण्यात".
नात्यातील खरी प्रगल्भता ही शब्दांमध्ये नसते, ती समजूतदार नजरेत असते...
आजकाल नातं म्हणजे 'status' ठरलंय...
मग ते relationship status असो की व्हाट्सअॅपचा...
पण प्रेम म्हणजे फोनवर घालवलेला वेळ नाही, किंवा story मध्ये tag करणं नाही...
प्रेम म्हणजे 'मी आहे, तुझ्यासाठी कायमचा' हे वेळेच्या कसोटीवर टिकून दाखवणं.
प्रेमात शरीर येतं ते शेवटी...
पण मन आणि आत्मा आधीच जोडले गेले असतील तरच त्या शरीराच्या स्पर्शाला अर्थ असतो.
आज नात्यात intimate होताना आपण intimacy विसरलोय...
आज आपण एकमेकांना जवळ घेतो, पण जवळपास राहत नाही...
शरीराच्या जवळ आल्यावर मन दूर गेलं तर ते 'प्रणय' नसतो तो केवळ एक 'कृती' राहते...
तुमचं नातं असावं असं...
जिथे नजरेनं वाटते ती सगळी भावना
स्पर्शाशिवाय होते जवळीक
शब्दांशिवाय होते संवाद.
#मनाचा_स्पर्श #नात्यांची_सावली #प्रेमाची_भाषा #वास्तवदर्शी_नाती #नजरूनाही_स्पर्श #RealisticMarathi #HeartTouching #भावनांचा_आरसा #मराठी_लेख #EmotionalTruth #IntimacyVsAttachment #SilentLove #ManatleVishwas
Comments
Post a Comment