संसार ही तडजोड नाही, समजूत असावी लागते

लग्न म्हणजे दोन मनं एकत्र येणं. दोन भिन्न व्यक्ती, भिन्न विचार, भिन्न सवयी आणि तरीही एकत्र जगण्याचा प्रयत्न.
पण आजचं वास्तव काय सांगतं?

 थोडीशी अडचण आली, मतभेद झाले, गैरसमज वाढले... की नातं तुटतंय. "घटस्फोट" आता तो मुद्दा नॉर्मल झाला आहे, कारण नातं जपणं आता ‘डेअरिंग’ वाटतं!

"आई-बाबांची अंधश्रद्धा पिढ्यांची फोड"

आई मुलीला म्हणते "सहन करू नकोस... तुला त्रास होतोय ना? चल, घरी चल!"

होय, मुलीला त्रास होत असेल तर तिच्या पाठीशी उभं राहणं योग्यच आहे. पण प्रत्येक भांडण ‘त्रास’ असतो का?
कधीकधी भांडण हे नात्याचा ‘प्रेशर रिलीफ व्हॉल्व्ह’ असतं.
प्रेम जसं हळूवार असतं, तसं भांडणं ही खरी असतात... पण त्यात समज आणि वेळ लागतो.

 "वाद नाही, संवाद हरवतोय"

सध्या प्रत्येक नातं ‘तू चुकलास मी बरोबर’ याच चक्रात अडकलेलं आहे.
दोघांनी संवाद साधायचा सोडून सल्लागार, आई-बाबा, मित्र-मैत्रिणींना मध्ये आणायला सुरुवात केली, की नात्याची खाजगी भिंत मोडते.

माहेरचं पाठबळ असावं पण ते संकटातून सावरण्यासाठी, संसार तोडण्यासाठी नाही.


 "फॅमिली कोर्टचा रस्ता सहज झालाय!"

हल्ली नवऱ्याच्या ‘स्वभावाचा’ मुद्दा देखील गुन्हा समजला जातो.
पत्नीच्या "भावनिक अपेक्षा पूर्ण न झाल्या" की तो मानसिक अत्याचार ठरतो, आणि घटस्फोटाचा अर्ज तयार होतो.

पण प्रश्न असा आहे 
❓ "तुम्ही आधी माणूस समजून घेतलंत का?"
❓ "प्रेमाच्या नावावर ‘सोयीचा संसार’ तर नाही ना सुरू केलात?"


 "तडजोड ही कमजोरी नाही ती ताकद आहे"

प्रत्येक यशस्वी जोडप्याच्या मागे असते एक लढाई मनाची, विचारांची, अहंकाराची.
ती लढाई बाहेरच्या लोकांना सांगितली नाही, कारण त्यांना ‘नातं’ जपायचं होतं, जिंकायचं नव्हे.

साडी, मोबाईल, गाडी, ट्रीप्स या गोष्टी आयुष्याचा पाया नाहीत.
त्या सुखद क्षणांमध्ये मिळाल्या तर सोनेपेक्षा मौल्यवान वाटतात. पण त्या गोष्टी मिळवताना प्रेम, सन्मान, संवाद हरवला तर त्या चपला होतात उपयोगाच्या पण अंतर्मनाला टोचणाऱ्या.

"संसार टिकवणं हे यश आहे केवळ लग्न केल्याने कोणी यशस्वी होत नाही!"

"मुलीला शिकवा पण फक्त पैसा कमवायला नाही,
तर नातं समजून घ्यायला, परिस्थिती हाताळायला शिकवा."

सुखी संसारात दोघेही ‘नुकसान’ सहन करतात... एकमेकांसाठी!

#संसाराचा_आरसा #घटस्फोट_नको #नातं_जपा #आईबापाची_भूमिका #समंजस_सल्ला #MarathiRealityCheck #VastavdarshiLekh #SavadachaAbhav #PremkiSamajh #संवाद_हरवतोय #नात्यांवर_मनापासून

Comments

Popular Posts