सौंदर्य जपायचं असेल, तर मालकीचा मोह सोडावा लागतो…
आपल्याला काहीतरी आवडतं एखादी वस्तू, एखादा क्षण, एखादा माणूस, एखादं नातं…
ते पाहिलं की मन भरून येतं…
मनात एकच विचार येतो
"हे माझं असावं…"
हीच सुरुवात असते मालकीच्या मोहाची.
आणि तिथून सुरू होतो एक हळूहळू सौंदर्य नष्ट होण्याचा प्रवास.
आपण का गमावतो ते जे आपल्याला आवडतं?
कारण आपण ज्या गोष्टी आवडतात त्या "समजून घेण्याऐवजी मालक होण्याचा प्रयत्न करतो."
एक मुलगी जिचं हसणं एखाद्याला आवडतं,
काही दिवसांत तिचं हसणं केवळ आपल्यासाठी हवंसं वाटू लागतं.
ती इतरांसोबत हसली, तर जळफळाट सुरू होतो…
काही वेळा आपल्याला एखाद्याचं बोलणं, विचार, अस्तित्व आवडतं
आणि मग त्याला आपल्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न सुरू होतो.
तो माणूस "आपल्यासारखाच" वागेल, बोलेल, राहील, असं गृहीत धरतो.
पण माणूस वस्तू नसतो.
त्याचं सौंदर्य म्हणजे त्याचं स्वतंत्र अस्तित्व.
नातं जेव्हा मालकी ठरतं…
जेव्हा प्रेमाच्या नात्यात मालकी उतरते, तेव्हा ती भावना कबजा बनते.
“तु माझी आहेस”
“माझ्याशिवाय कुणाशी बोलू नकोस”
“माझ्या प्रत्येक निर्णयाला तू ‘हो’ म्हणायलाच हवं”
हे सगळं प्रेमातलं नव्हे, मालकीचं प्रतिबिंब आहे.
तेच नातं एका क्षणी इतकं गुदमरून जातं की एक वेळ येते,
आवडणारी गोष्ट आपल्यापासून दूर जाते.
आणि मग म्हणावं लागतं
"सौंदर्य जपायचं होतं, पण मोहाने गमावलं."
समाजातल्या संबंधांचंही असंच आहे…
आपल्याला एखाद्याचं यश आवडतं पण ते आपल्या नसल्याचं जळतं.
आपल्याला एखाद्याचं स्वाभिमान आवडतो पण तो आपल्या अधीन नाही, म्हणून खटकतो.
एखादं व्यक्तिमत्त्व आकर्षित करतं पण त्याच्यावर हक्क नाही, म्हणून तिरस्कार वाटतो.
आणि हे सगळं करताना आपण त्या सौंदर्याला नष्ट करतो.
सौंदर्याचं खरं मोल ते स्वतःचं असू द्यावं
जसं एखादं फुलबागेत फुललेलं फूल…
ते आपलं नसतानाही आपल्याला आनंद देतं
त्याला तोडून आपल्याजवळ ठेवलं, तर त्याचा सुगंध संपतो.
तसंच…
काही नाती केवळ दूरून जपली जातात.
काही आठवणी फक्त अनुभवण्यासाठी असतात.
काही क्षण संपणार असले, तरी ते हक्क न सांगता जपण्यासाठी असतात.
मालकी नसेल, तर प्रेम शुद्ध राहतं.
नात्यांमध्ये जर "माझं-माझं" करणं नसेल,
तर ती नाती फुलतात, बहरतात, आणि टिकून राहतात.
कधी कधी एखाद्याचं “आपलं नसणं” हेच आपलं खरं नशिब असतं
कारण ते आपलं असतं, फक्त हक्काने नव्हे, मनाने.
म्हणून…
आवडणारी प्रत्येक गोष्ट आपली असावी, हा मोह सोडला…
तर ती गोष्ट कधीही न संपणाऱ्या सौंदर्याचं रूप घेते.
आपल्याला त्यात स्वतःला हरवता येतं, तिला गमावल्याशिवाय जपता येतं…
#मालकीचा_मोह
#भावनांचं_सौंदर्य
#वास्तवदर्शी_लेख
#नात्यांचा_अर्थ
#मुक्तप्रेम
#मनगर्भ_विचार
#समाजाचा_आरसा
#हरवलेलं_सौंदर्य
#मौनाचे_नाते
#मनाला_स्पर्शणारा_लेख
Comments
Post a Comment