"संवाद संस्कारांनी सजलेला असावा!"

आजच्या डिजिटल युगात संवादाचा अर्थच बदलला आहे.
पूर्वी पत्र लिहायचे, पोस्टमनची वाट बघायची, एका अक्षराच्या मागे भावना दडलेल्या असायच्या.
आता? फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली की आपण लगेच 'ओळखीचा' होतो, इनबॉक्समध्ये "Hi dear", "U looking hot" हीच भाषाच फॉर्मल झालीय.

स्त्री म्हणजे नातींची जन्मदात्री.
आई म्हणून ती जगाला जन्म देते,
बहिण म्हणून सावली बनते,
मैत्रीण म्हणून समजून घेत राहते,
पत्नी म्हणून पाठीशी उभी राहते…
पण सोशल मीडियावर?
ती केवळ "डिस्प्ले फोटो" बनून राहते.

 संवादाची सुसंस्कृती गरज की निवड?

"Hello" वरून सुरू झालेला संवाद जर "Whatsapp number दे ना" वर संपत असेल,
तर आपण केवळ शब्द वापरत नाही… आपण आपल्या संस्कारांचं प्रदर्शन करत असतो.

संवाद ही सृजनाची गोष्ट आहे.
संवादातून बंध तयार होतात… नातं निर्माण होतं… समजुत विकसित होते.
पण आज संवादाला उद्दिष्ट नसलं, भाषा असभ्य, हेतू विकृत 
हे फक्त मुलींनाच नव्हे, आपल्या एकूणच समाजाचं अपयश आहे.

स्वातंत्र्य म्हणजे बिनधास्तपणा नव्हे

आपण "लोकशाहीत जगतो" म्हणून स्वातंत्र्याचं गाजर गातो,
पण स्वातंत्र्य म्हणजे कोणालाही हवी तशी कमेंट करणं नसतं.
ते अभिव्यक्तीचं हक्क आहे पण दुसऱ्याच्या सन्मानाच्या सीमारेषेपर्यंतच.

तिच्या कपड्यांवर, स्टेटसवर, तिच्या "अ‍ॅक्टिव्ह असण्यावर" कमेंट करण्याचा अधिकार,
तिला न दिलेल्या नात्याचा दावा,
फक्त पुरुषी अहंकाराचं प्रदर्शन आहे माणूस म्हणून अपयशाचंही.

 संस्कार कुठे हरवले?

एकच प्रश्न मनात पडतो 
आपण ‘आई’ म्हणणाऱ्या स्त्रीचा सन्मान करतो,
पण दुसरी एखादी स्त्री तीच आई कुणासाठी असते हे का विसरतो?

तुम्ही चुकलात तर ती माफ करते,
पण म्हणून तीच माफ करणं तुमचं हक्क बनतं का?

आदर, प्रेम आणि वागणूक हे त्रिकूटच नातं टिकवतं

प्रेम असेल, तर त्यात सन्मान असलाच पाहिजे.
एक स्मितहास्य, एक सुसंस्कृत संवाद, एक भान ठेवलेली विनंती 
हे नातं तयार करतात.
बाकी सगळं केवळ डिजिटल वासना बनून उरते.

संवादाला सुरुवात होऊ द्या, पण सुसंस्कृततेची चौकट विसरू नका.
कारण ती "ती" तुमच्याही आयुष्यात आहे आई म्हणून, बहिण म्हणून, मैत्रीण म्हणून...
कदाचित भविष्यात पत्नी म्हणूनही!

#संवाद_की_संस्कार
#Digitalमर्यादा
#स्त्रीसन्मान
#संस्कृतीचीओळख
#SocialMediaResponsibility
#RespectHerAlways
#संवाद_नात्यांचा_आरंभ
#मराठीलेख
#RealisticMarathiThoughts

Comments

Popular Posts