अदृश्य नात्यांची कहाणी...
कधी अनुभव आलाय का?
आपण कोणालातरी जीवापाड जपतो, त्याच्या प्रत्येक मेसेजला उत्तर देतो, त्याच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो...
आणि तोच माणूस आपल्याला वेळेअभावी नव्हे, तर प्राधान्यअभावी दुर्लक्ष करतो...
सुरुवातीला वाटतं "बिझी असेल..."
पुढे वाटतं "माझी किंमत कदाचित त्याच्या आयुष्यात कमी असेल..."
आणि शेवटी "मीच मूर्ख आहे का?"
आपण १० वेळा मेसेज करतो, १ रिप्लाय येतो...
पण तो १ रिप्लायही इतका मधाळ वाटतो, की त्याच्या जोरावर पुन्हा १० वेळा धावतो आपण...
मनातून राग, मनातून तक्रारी सगळं असूनही, त्या व्यक्तीचं एक 'seen' सुद्धा आपल्याला हसू आणून जातं.
आणि मग कधीकधी प्रश्न पडतो
"हीच का माझी लायकी?"
"माझ्या प्रेमाची किंमत इतकीच कमी आहे का?"
"की मीच इतका भावनिक, की समोरच्याला त्रास होतोय?"
असं काहीसं सगळ्यांच्याच आयुष्यात एकदा तरी होतं...
कारण प्रेम हे केवळ समजून घेण्याचं नसतं,
ते जपून ठेवण्याचं असतं...
आजच्या जगात नाती 'टायमिंग'वर चालतात.
"किती वेळा बोलतोस",
"कधी मेसेज करतोस",
"किती वेळा भेटतोस"
ह्यांवर नात्यांची गणितं मांडली जातात...
आणि भावना? त्या फक्त 'स्टेटस अपडेट'मध्ये दिसतात...
"अदृश्य नात्यांमध्ये आपण खूप काही हरवत जातो..."
आपलं स्वाभिमान,
आपली शांतता,
आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं स्वतःवरचं प्रेम.
पण तरीसुद्धा...
आपण रोज त्या व्यक्तीला मेसेज करतो,
रोज वाट बघतो,
रोज तो Online येतोय का ते पाहतो,
आणि शेवटी मौन स्वीकारतो.
का?
कारण कुठेतरी आत खोलवर आपल्याला तो 'एक रिप्लाय' पुरेसा वाटतो.
कधी तो रिप्लाय “ठीक आहे” इतकाच असतो,
पण त्याच्यात आपल्या हजार भावना गुंतलेल्या असतात...
प्रत्येक जखम दिसत नाही,
आणि प्रत्येक नातं 'official' नसतं...
पण ती नाती आपल्याला 'unofficial' अश्रू देऊन जातात...
ज्यांचा हिशोब कुठल्याच डायरीत होत नाही...
#वास्तवदर्शी_लेख #भावनांचं_नातं #एकतर्फीप्रेम #मनाचा_संघर्ष #नात्यांची_तोटवाट #प्रेमाची_कीमत #भावनिक_मराठी_लेख #हृदयस्पर्शी #MarathiQuotes #UnsaidFeelings #seenzone #marathiwriter
Comments
Post a Comment