स्क्रोलिंगचा मेंदूवर भार विस्मरणाच्या उंबरठ्यावर उभा समाज
कधी काळी आपले आयुष्य सिमित होतं एक घर, एक आंगण, एक रेडिओ, काही पत्रं आणि आठवणींची पोतडी. त्या पोतडीत आपण प्रत्येक प्रसंग जपून ठेवत असू. शेजारच्या काकूंचा वाढदिवस, मावशीचा फोन नंबर, शाळेच्या मैदानातली शेवटची बाद हे सारं मनाच्या एखाद्या कोपऱ्यात खूणगाठ बांधून ठेवलेलं असायचं.
आज?
सकाळ झाली की पहिलं स्क्रोल बातम्या नाहीत, चहा नाही, सुरुवातच स्क्रीनवरच्या 'रिल'ने होते. मग दुसरं स्क्रोल, तिसरं, चौथं… आणि असं करत करत वेळ आणि विचार ओघळून जातात.
मेंदूला दिलंय आपण डिजिटल वरणभात चघळत नाही, फक्त गिळतो आहोत.
विचार करण्याचा वेळच उरलाय का?
कधीकाळी आपल्या आजीला जवळजवळ ५० लोकांचे मोबाईल नसतानाही फोन नंबर पाठ असायचे. आपण? आपलीच आई आज हॉस्पिटलमध्ये गेली तर तिचा नंबर आठवण्याऐवजी Contacts मध्ये शोधतो.
म्हणजे मेंदूला विसरायचं शिकवलं जातंय.
सततच्या स्क्रोलिंगने मेंदू "इन्स्टंट रिवॉर्ड" वर अवलंबून झाला आहे. ज्ञान नाही, गती हवी. खोली नाही, व्हायरल व्हावं एवढीच अपेक्षा.
म्हणूनच विचार खोलवर जात नाहीत, चर्चा सतही होतात.
“म्हणूनच स्मरणशक्ती कमी, निर्णयक्षमता ढासळलेली, आणि संवाद हरवत चालला आहे.”
Neuroscience सांगते की सततच्या स्क्रोलिंगमुळे dopamine वाढतं आणि मेंदू सतत नवीनतेचा, थराराचा, वेगळेपणाचा मागणी करतो.
शांतपणे पुस्तक वाचणं, गप्पा मारणं, चिंतन करणं सगळं ‘बोर’ वाटू लागतं.
आपण विचार करणं बंद केलंय, कारण आपल्यासाठी ते मोबाईल करू लागलंय.
“यंत्रामधून माणूस हरवतोय, आणि तेही हसत हसत!”
बाळाला आजीची गोष्ट ऐकायची नाही, त्याला ‘व्हिडीओ’ हवा आहे.
शिक्षकाचं बोलणं कंटाळवाणं वाटतं, कारण स्क्रीनवरचा एनिमेशन झपाट्यानं बदलतो.
मुलाखतीला गेलेलं मुलगं ‘AI Interview Prep’ करून जातंय, पण real संवादात कसं वागायचं तेच माहित नाही.
उपसंहार
आज स्क्रीन आहे, पण संवेदना नाहीत.
ज्ञान आहे, पण स्मरण नाही.
लिंक आहे, पण नातं नाही.
बदलायला हवं.
दिवसातून २ तास तरी मोबाईलपासून दूर राहा.
किती वेळ स्क्रोल करता याचा हिशोब ठेवा.
आणि सगळ्यात महत्त्वाचं आठवणी पुन्हा ‘स्मृती’मध्ये साठवा, केवळ ‘गॅलरी’मध्ये नाही.
#डिजिटलताव #वास्तवदर्शीलेख #मेंदूआळशी #स्क्रीनचा प्रभाव #स्क्रोलिंगचा त्रास #आठवणीविसरल्या #समाजाला_आरसा #DigitalDetoxMarathi #MarathiRealityPost #RealLifeReflection
Comments
Post a Comment