स्त्री – अस्तित्वाच्या वळणावर...

ती एक स्त्री आहे…
ही ओळख पुरेशी आहे का?
म्हणजे तिला स्वतःचं मत, इच्छा, स्वप्न, भावना, आत्मसन्मान असणं ही काही 'लक्झरी' नाही.
पण तरीही ती रोज 'सहन' करते…

हो, ती सहन करते...
कारण तिला लहानपणापासून शिकवलं गेलंय
"संसारात टिकायचं असेल तर तोंड बंद ठेवायचं."
"पुरुष चिडला तर गप्प राहा, नुसता हात उगाच उचलला तरही काही बोलू नकोस."
"नवऱ्याला जे हवं ते द्यायचं, मग तो वेळ कोणतीही असो…"

तीच्या शरीरावरच्या ओरखड्यांना, जखमांना, आणि अंतर्मनावरच्या ओरडांना
'पतीपरमेश्वर'चा हक्क समजून समाज गप्प बसतो.

एका स्त्रीच्या शरीरावरची जबरदस्ती म्हणजे काय फक्त बलात्कार असतो?
मग नवऱ्याने त्याच्या इच्छेने
तिच्या ना म्हणण्याचा अपमान करत
रोज तिच्यावर हक्क गाजवणं
हे काय वेगळं?

ती रात्री झोपलेली असते थकलेली, मनाने तुटलेली…
पण त्याला त्या सगळ्याशी काही देणंघेणं नसतं.
तो फक्त आपल्या तात्पुरत्या ‘गरजांचा’ विचार करतो.
तीची ना, तीचा विरोध, तीचा थरथराट…
या सगळ्या गोष्टी त्याला 'पुरुष' असल्याचं प्रमाणपत्र वाटतात.

ती रडते, किंचाळते, पण घरातल्या भिंतींना आवाज उमगत नाही.
ती काही सांगायचा प्रयत्न करते, पण आई म्हणते "संसारात असंच चालतं."
सासू म्हणते "तूच काहीतरी चूक करत असशील."
आणि समाज?
त्याला तर ‘ती’च नेहमी दोषी वाटते.

तिच्या वेदनांचं मोजमाप कसं केलं जातं?
त्याच्या रागाच्या आवाजाने?
की तिच्या गप्प राहण्यानं?

पण…

जर हीच गोष्ट एखाद्या पुरुषावर घडली असती तर?

जर त्याला नकार दिला गेला असता,
त्याच्या भावना पायदळी तुडवण्यात आल्या असत्या,
त्याच्या शरीराचा वापर केवळ ‘उपभोगासाठी’ केला गेला असता –
तर समाजाने हा ‘अन्याय’ म्हणून बोंबा मारल्या नसत्या का?

मग स्त्रीचा आवाज कधी ऐकला जाणार?

कधी समाज तिच्या त्या न दिसणाऱ्या जखमांकडे बघणार?
कधी तिच्या सहनशीलतेच्या किंमतीवर प्रश्न विचारला जाणार?

कारण हे फक्त "शारीरिक शोषण" नसून
हा तिच्या आत्म्याचा, मनाचा, अस्तित्वाचा खून आहे…

ती फक्त शरीर नाही…
ती एक पूर्ण व्यक्तिमत्व आहे भावना असलेली, मत असलेली,
स्वतःच्या आयुष्यावर हक्क असलेली एक व्यक्ती!

आता वेळ आलीय…

गप्प राहणं थांबवायची,
तीच्यावर झालेलं अन्याय 'नॉर्मल' समजणं थांबवायची,
आणि सर्वात महत्त्वाचं 
तिला ‘मानव’ म्हणून पाहण्याची!

#तीही_माणूस_आहे #स्त्रीची_वेदना #पुरुषसत्ताक_समाज #DomesticRape #EmotionalAbuse #RealMarathiPost #SocialMirror #स्त्रीच्या_अस्मितेचा_सन्मान #MarathiRealityCheck #SilentPainOfWomen #EqualityBeginsAtHome

Comments

Popular Posts