आई-वडिलांकडे दुर्लक्ष – एक कडवट वास्तव
आज आपण कुठेही बघा…
मोठमोठ्या गाड्या, बंगले, परदेशातल्या नोकऱ्या, महागडे कपडे
सगळं आहे, पण तरीही काहीतरी कमी आहे.
आणि ती कमी म्हणजे “आई-वडिलांच्या आशीर्वादाची.”
पूर्वी घर लहान होतं, पण कुटुंब मोठं होतं.
आज घर मोठं झालं, पण आई-वडील मात्र त्या घराच्या बाहेर ढकलले गेले.
का? कारण ते “जुने विचाराचे” आहेत.
कारण त्यांना स्मार्टफोन चालवता येत नाही.
कारण ते आधुनिक भाषेत बोलत नाहीत.
पण हेच लोक आपल्याला लहानपणी चालायला शिकवणारे,
शाळेत जायला हात धरून नेणारे,
आपल्या पहिल्या यशावर डोळे पुसणारे होते,
हे आपण विसरलो.
आज मुलांना वाटतं
“आम्ही कमावतो, आमचं घर आहे, आमची लाइफ आहे.”
पण ते हे विसरतात की
त्या घराचं पहिलं दगड आई-वडिलांनीच घातलेलं असतं.
त्यांनीच आपले पोटचे पाणी पिऊन
आपल्याला शिकवलं, वाढवलं, उभं केलं.
आई-वडील म्हातारपणात हट्टी होतात,
लहान मुलांसारखे वागतात,
कधी बोलतात, कधी रागावतात…
पण आपण त्यांना समजून घ्यायला तयार नसतो.
आपण म्हणतो “त्यांच्यामुळे त्रास होतो.”
पण खरं म्हणजे त्रास त्यांना होतो,
कारण ज्यांना त्यांनी आयुष्यभर जपलं,
तेच आज त्यांच्याकडे पाठ फिरवतात.
खूपदा आपण ऐकतो
“आजोबा-आजी वृद्धाश्रमात आहेत.”
पण प्रश्न पडतो
हे वृद्धाश्रम भरलेले आहेत,
मुलं मात्र हॉटेलमध्ये डिनरला जातात,
यात नेमकं काय हरवतंय?
हरवतंय ते म्हणजे
नातं, संस्कार, माणुसकी.
आई-वडील फक्त छत नाहीत,
ते घराचा पाया आहेत.
पाया मजबूत असेल तरच इमारत उभी राहते.
आज आपण पायाचाच अपमान करतोय,
मग ही इमारत किती दिवस टिकेल?
कधी कधी पैसा, करिअर, हौस,
यांच्या मागे धावताना आपण विसरतो की
आई-वडिलांचा हसरा चेहरा,
त्यांचा हात डोक्यावर,
त्यांचं आशीर्वादाचं वाक्य,
यापेक्षा मोठं यश नाही.
#आईवडील #समाजआरसा #कुटुंब #संस्कार #आदर #वृद्धाश्रम #नाती
Comments
Post a Comment