पैसा आहे, पण आपलं माणूसपण कुठे हरवलं?

आजच्या काळात पैसा हेच सर्व काही झालं आहे.
घर मोठं, गाड्या महागड्या, कपडे ब्रँडेड, मोबाईल्स अपडेटेड,
पण तरीही घरात शांतता नाही, मनात समाधान नाही,
आणि नात्यांत जिव्हाळा नाही.

पैशासाठी धडपड

आपण सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत पैसा कमावण्यासाठी धावतो.
कधी नोकरी, कधी व्यवसाय, कधी पार्ट-टाइम जॉब,
कधी ओव्हरटाइम करून, तर कधी परदेशात जाऊन.
पैसा मिळतो… हो, पण त्या पैशासाठी आपण गमावतो काय?

मुलाच्या पहिल्या शब्दाचा आनंद…

मुलीच्या शाळेतील पहिल्या नाटकाचा आनंद…

आईच्या हातच्या गरम गरम जेवणाचा स्वाद…

बायकोच्या चेहऱ्यावरचं समाधानाचं हसू…


हे सगळं आपल्या हातातून निसटतं.

पूर्वीच्या स्त्रिया आणि आताची पिढी

पूर्वीच्या काळात स्त्रिया घर सांभाळत असत.
मुलांचा अभ्यास, संस्कार, घरची शिस्त, सगळं त्यांच्या हातात असे.
पैसा कमी असला तरी घरात शांतता असे,
मुलं चुकीच्या मार्गाला जात नसत,
कारण घरात "आई" सतत जागरूक असे.

आजच्या काळात आईसुद्धा नोकरी करते.
हो, गरजेचं आहे! पण त्याचं भान ठेवायला हवं की
मुलांना फक्त पैसा नको, तर आई-बाबांचा वेळ हवा आहे.

मुलं का बिघडतात?

पालक म्हणतात "आम्ही सगळं दिलंय मुलांना, तरी ते बिघडले!"
पण खरा प्रश्न असा आहे
👉 तुम्ही त्यांना वस्तू दिल्यात, की संस्कार दिलेत?
👉 तुम्ही त्यांना खेळणी दिलीत, की तुमचं वेळचं खेळणं दिलं?
👉 तुम्ही त्यांना मोबाईल दिलात, की त्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तर दिलं?

मुलांना पैसा नाही तर लक्ष हवं असतं.
ते लक्ष मिळालं नाही की ते वाईट संगतीकडे वळतात.

मुलींचं चित्र

आजकालच्या मुली “फ्रीडम”च्या नावाखाली,
रिल्स, शॉर्ट व्हिडिओ, फॅशन, पार्टी… या सगळ्यात अडकतात.
हो, स्वतःचं करिअर, स्वतःचं अस्तित्व असावं हे नक्की महत्वाचं आहे.
पण पालकांची जबाबदारी नाही का की
मुली योग्य दिशेला चालतात का नाही ते पाहणं?

"पैसा कमवतेय, नाव कमावतेय, फॉलोअर्स आहेत"
या मोहात आई-वडील मुलीच्या चुकीकडे दुर्लक्ष करतात.
आणि नंतर मोठा घाव बसला, तर डोक्यावर हात ठेवून बसतात.

खरं समाधान कुठे आहे?

पैसा जीवनात आवश्यक आहे,
पण जीवनाचं खरं सुख पैशाच्या ढिगाऱ्यात नाही,
तर नात्यांच्या उबेत आहे.

एकत्र बसून जेवणात आहे.

एकत्र फिरायला जाण्यात आहे.

मुलांसोबत गप्पा मारण्यात आहे.

आई-वडिलांच्या सेवेत आहे.

बायकोच्या हसऱ्या चेहऱ्यात आहे.


आज आपण पैसा कमावतो,
पण तो उपभोगायला ज्या लोकांची गरज आहे 
तेच लोक आपल्यापासून दूर जात आहेत.

बदलाची गरज

आज समाजाला गरज आहे पैशापेक्षा समजूतदारपणाची.
👉 थोडा कमी पैसा कमावला तरी चालेल,
पण मुलांच्या डोळ्यांतून प्रेम ओसंडलं पाहिजे.
👉 महागडी गाडी घेतली नाही तरी चालेल,
पण वृद्ध आई-बाबा आपल्या जवळ बसून समाधानी असले पाहिजेत.
👉 मोठं घर केलं नाही तरी चालेल,
पण त्या छोट्याशा घरात आपुलकी भरलेली हवी.

पैसा नक्की कमवा, पण
त्यासाठी माणसाला गमावू नका.
कारण पैसा संपल्यावर पुन्हा कमावता येतो,
पण नाती तुटली की पुन्हा जुळत नाहीत.

#पैसा #कुटुंब #समाजआरसा #नाती #आयुष्याचासत्य #माणुसकी #खरंसुख

Comments

Popular Posts