रील्स की अश्लीलता? पैशाचा मोह आणि संस्कारांची हरवलेली लाज

आजचा समाज मोबाईलच्या पडद्यामागे कैद झालेला आहे. रील्स हे आजचं नवीन व्यसन झालं आहे. रील्स बनवणं वाईट नाही पण त्याच्या नावाखाली जे चालतंय ते चिंताजनक आणि लाजिरवाणं आहे.

✦ "फ्रीडम" की "फॅशन"?

आज अनेक मुली म्हणतात "आम्हाला जगण्याचा हक्क आहे, आम्ही फ्री आहोत, आमच्या इच्छेप्रमाणे जगणार."
हो, स्त्रीला जगण्याचा हक्क आहे.
हो, तिला आनंद घ्यायचा आहे.
हो, तिला स्वप्नं पूर्ण करायची आहेत.

पण या स्वातंत्र्याचं रूपांतर जेव्हा अश्लीलता, शरीरप्रदर्शन आणि वासनांची बाजारपेठ यात होतं तेव्हा हा "फ्रीडम" नाही, तर "फ्रस्ट्रेशन" असतो.

✦ पैसे कमावणं की सन्मान हरवणं?

रील्सच्या नावाखाली मुली अंगप्रदर्शन करतात, अर्धवट कपडे घालून नाचतात, लाजिरवाणे हावभाव करतात. त्यावर लाखो "लाईक्स" आणि "फॉलोअर्स" मिळतात.
पण प्रश्न असा आहे
👉 हे कौतुक तुमच्या टॅलेंटचं आहे की तुमच्या शरीराचं?
👉 हे लोक उद्या तुम्हाला कलाकार म्हणून आठवतील की फक्त "हॉट कंटेंट" म्हणून?

पैसे नक्कीच मिळतील, पण सन्मान आणि प्रतिमा कायमची हरवेल.

✦ पालकांची डोळस जबाबदारी कुठे?

पालकांची आजची मोठी चूक म्हणजे
👉 "मुलगी पैसे कमावते, म्हणजे बरं आहे."
👉 "तिने किती फॉलोअर्स मिळवले, किती इनकम होते, याचा आम्हाला अभिमान आहे."

पण आईवडीलांनी कधी विचार केला का की,
👉 "माझ्या मुलीचे हे व्हिडिओ तिची मुलं, नातवंडं पाहतील तेव्हा त्यांना लाज वाटणार नाही का?"
👉 "समाज तिच्या टॅलेंटकडे बघतोय की शरीराकडे?"

पालकांनीच जर योग्य-अयोग्य सांगितलं नाही, तर मुलगी पैशासाठी काहीही करेल. आणि त्या "काहीही"मुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल.

✦ मुलींचीही जबाबदारी

हो, मुलींनाही जबाबदारी आहे.
👉 "पैसा पटकन मिळतोय" म्हणून सन्मान विकायचा का?
👉 "लोक बघतात म्हणून अंग दाखवायचं का?"
👉 "फॉलोअर्ससाठी आत्मसन्मान गमवायचा का?"

आज जे टाळ्या वाजवतात, उद्या तेच लोक हसतात, चिडवतात, वापरतात आणि बाजूला करतात.

✦ खरी कला कुठे आहे?

आज हजारो मुली अभ्यास, नृत्य, संगीत, लेखन, उद्योजकता यात नाव कमावतात. ही खरी कला आहे.
कला म्हणजे प्रेरणा, संस्कार, आदर्श.
पण केवळ शरीर विकून मिळवलेलं नाव म्हणजे "कौशल्य" नाही ते "कच्चा बाजार" आहे.

आज समाज दोन टोकांवर विभागला आहे
👉 एकीकडे सुशिक्षित, कष्ट करणाऱ्या मुली आहेत ज्या मेहनतीने यश कमावतात.
👉 आणि दुसरीकडे "शॉर्टकट" शोधणाऱ्या मुली आहेत ज्या फक्त अंग दाखवून पैसा कमावतात.

या दुसऱ्या गटाने समाजाचं नैतिक अध:पतन केलं आहे. आणि हो याला जितकी मुली जबाबदार आहेत तितकेच पालकही जबाबदार आहेत.

रील्स बनवा, पैसा कमवा, नाव कमवा पण ते तुमच्या टॅलेंटवर आधारित असलं पाहिजे, शरीरावर नव्हे.
पालकांनी मुलींना योग्य संस्कार द्यायला हवेत. कारण पैसा पुन्हा मिळतो, पण प्रतिमा डागाळली की आयुष्यभर साफ होत नाही

#रील्सकीअश्लीलता #समाजआरसा #संस्कार #पालकांचीजबाबदारी #आत्मसन्मान #मराठीलेख #नवीनपिढी #वास्तव

Comments

Popular Posts