प्रेम, अपेक्षा आणि वास्तव

आपल्या समाजात प्रेम ही भावना अजूनही खूप गोड, पण तितकीच गैरसमजांनी वेढलेली आहे.
पुरुष असो वा स्त्री प्रेमात पडताना दोघंही आपापल्या जगातून दुसऱ्याला पाहतात.
पुरुषाला वाटतं,
"ती माझ्याशिवाय जगूच शकणार नाही…"
तर स्त्रीला वाटतं,
"तो माझ्यासाठी सगळं त्याग करेल…"

पण खरं आयुष्य एवढं रोमँटिक नसतं.
कारण प्रेम ही फक्त भावना नाही ती एक जबाबदारी आहे.

आपण पाहतो, अनेक तरुण मुलं प्रेमभंग झाल्यानंतर स्वतःला संपवतात, दारूच्या आहारी जातात, किंवा आयुष्यभर "देवदास" होऊन फिरतात. त्यांना वाटतं, समोरची व्यक्ती गेली म्हणजे सगळं संपलं.
पण खरं म्हणजे, समोरच्याने आयुष्य पुढे नेलं असतं आणि मागे राहतो तो फक्त मूर्खपणा करून आयुष्य वाया घालवणारा.

आजच्या काळात ही खरी वस्तुस्थिती आहे

मुलं अजूनही प्रेमाला जीवनाचा शेवट समजतात.

पण मुली, प्रेम नसलं तरी आयुष्य पुढे नेण्याची ताकद दाखवतात.

आणि समाज? तो अजूनही तुटलेल्या मुलाला दोष देतो आणि पुढे गेलेल्या मुलीला नावं ठेवतो.


खरं तर दोघांनीही दोषी ठरायची गरज नाही
पण हे समजून घ्यायला हवं की प्रेम एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नाही.

आज कित्येक तरुण आपले आई-वडील, आपली स्वप्नं, आपलं भविष्य विसरून एका व्यक्तीसाठी वेडे होतात. आणि ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यातून गेली की ते कोसळतात.
पण एकदा तरी त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा
"मी ज्याच्या मागे रडतोय, तो/ती माझ्यासाठी रडेल का?"

बहुतेक वेळा उत्तर नाही असतं.
कारण आयुष्य थांबत नाही ते पुढे जातं.

खरं पाहता, सर्वात मोठं प्रेम हे आईवडिलांचं असतं.
जे नि:स्वार्थ असतं.
ते कधीच संपत नाही.
पण दुर्दैव असं की, आपण ते प्रेम गृहित धरतो आणि बाहेरच्या जगात मिळालेल्या तात्पुरत्या प्रेमासाठी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करतो.

शेवटचा विचार

प्रेमात अपयश आलं म्हणून जीवन संपवणं ही कमजोरी आहे.
खरा बळकट तोच
जो विरह पचवतो,
जखमा सहन करतो,
आणि पुन्हा एकदा डोकं उंच करून आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या स्वप्नांसाठी जगतो.

कारण प्रेमात हरवलेल्याला समाज हसतो, पण प्रेमातून उभं राहिलेल्याला समाज सलाम करतो.

#वास्तवदर्शीलेख #प्रेमाचीसत्यता #समाजाला_आरसा #देवदास #प्रेमआणिआयुष्य #आईवडील_सर्वातमोठंप्रेम #MarathiThoughts #भावनिकलेखन

Comments

Popular Posts