ऑफिसमध्ये अफेअरच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर…

ही फक्त आकडेवारी नाही, हे आपल्या घरांचं फुटलेलं आरसंच आहे.”

आजकाल ऑफिस म्हणजे नुसतं कामाचं ठिकाण उरलं नाही…
तिथे समजूतदारपणा मिळतो, बोलणारा कुणीतरी मिळतो,
आणि घरी मिळत नाही ती “कदर” तिथे मिळू लागते.

मग कसली आश्चर्य?
अफेअरमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर…
अर्थातच असंच होणार ना!

खरं सांगायचं तर… अफेअर “ऑफिसमध्ये” होत नाही.

ते आधी घरातच सुरू होतं
जेव्हा नवरा-बायकोचं बोलणं बंद होतं.

एकेकाळी नात्यांमध्ये ऊब होती…
आज घरात शांतता असते बोलण्याची नाही,
तर थंडपणाची.

एकाला दुसऱ्याला वेळ नाही,
एकाला दुसरा समजत नाही,
आणि एकमेकांना ऐकायला तर कुणालाच वेळ नाही.

मग भावनांचं ओझं कुठे जाईल?
जिथे कुणीतरी “काय झालं?” असं विचारतं
त्या ऑफिसातील व्यक्तीकडेच ना?

आजकाल अफेअर प्रेमामुळे होत नाही…

ते होतं अपूर्ण राहिलेल्या भावनांमुळे.

घरी जे मिळत नाही
आदर, ऐकून घेणं, साथ,
ते ऑफिसात कधी-कधी एका छोट्या gesture मध्ये मिळतं:

“तू ठीक आहेस का…?”
“आज उदास दिसतेस…”

आणि एवढ्यानेच मन भरकटतं…
नातं नाही, पण जवळीक वाढते.
आणि शेवटी काय?
घराचं आयुष्य ढासळतं.

पण खरा फटका कुणाला बसतो माहीत आहे का?

 घरातल्या मुलांना
 आई-वडिलांच्या विश्वासाला
 आयुष्यभर टिकवायला बांधलेल्या घराला
 आणि त्या व्यक्तीलाही कारण त्याचं स्वतःचं मनही तुटतं

कोणाला वाटतं अफेअर म्हणजे “नवं सुख”?
नाही!
ते असतं तात्पुरता आधार आणि आयुष्यभराचं ओझं.

समाजाची समस्या अफेअर नाही…

समस्या आहे घरातील नाती हलकी आणि कमकुवत होणं.

आपल्याकडे लोक मोबाईलला चार्जर लावतात,
पण नात्यांना वेळ देण्याला वेळ नाही.

घरात बोलणं नाही,
एकत्र बसणं नाही,
आदर नाही,
आणि मग शोध सुटतो कुठेतरी बाहेर “समजणाऱ्या” व्यक्तीचा.

हे कितीही कटू वाटलं तरी सत्य आहे.

या सगळ्याचा उपाय?

नात्यांना वेळ द्या.
अबोला संपवा.
एकमेकांशी बोला.
जिथे आपलं घर आहे ते आधी मजबूत करा.

कारण ऑफिसमधला एखादा सहकारी
तुम्हाला “समजतोय” असं वाटू शकतं,
पण तुमचं आयुष्य मात्र घरातले लोक उभं ठेवतात.

नाती जपा,
नात्यांना वाचवा…
नाहीतर आकडे वाढत राहतील,
आणि घरं तुटत राहतील.

तुम्हाला काय वाटतं?

आपली नाती इतकी कमजोर कधी झाली?
आपण बदल कसा आणू शकतो?

कमेंटमध्ये तुमचं मत जरूर लिहा.

Comments

Popular Posts