प्रेम आंधळं नसतं…
प्रेम आंधळं नसतं…
ते अधू केलं जातं जेव्हा आपण स्वतःपेक्षा कुणाला जास्त मानतो.”
खरं सांगायचं तर प्रेमात चूक डोळ्यांची नसते,
चूक असते मनाची.
मनाला जेव्हा कुणी जवळ वाटतं,
तेव्हा त्याच्या प्रत्येक दोषातही आपण गुण शोधतो.
आपल्यासाठी कोणी नसतं…
पण आपण मात्र एका व्यक्तीचे होऊन जातो
गाठ सुटली तरी नातं धरून ठेवणारे आपणच असतो.
माणसाच्या असण्याची, बोलण्याची, रडण्याची, शांत राहण्याचीही किंमत जिथे नसते…
तेच आपण प्रेम म्हणून पोटाशी बाळगून ठेवतो.
जिथे आपले शब्द हलके वाटतात,
भावना जड वाटतात,
आणि प्रयत्नांना “नाटक” म्हणलं जातं
तिथेही आपण स्वतःला दोष देत राहतो…
“मीच कमी पडतोय…”
“मीच चुकतोय कदाचित…”
नाही!
कधी कधी आपण चुकीच्या जागी पूर्ण मनाने उभे असतो
हीच सगळी समस्या.
प्रेम हे गुलाबासारखं असतं…
काट्यात वाढतं, पण तरीही सुगंध देतं.
आपणही तेच करतो
जखमा असूनही हसत राहतो,
नाकारलं गेलं तरी हात पुढे करतो,
आणि चुरगळलं तरी त्याच ओंजळीत परत फुलण्याचा प्रयत्न करतो.
समोरचा मात्र?
फुलावर हक्क घेतो…
काटक्यांचं दुःख कोण विचारतं?
समस्या प्रेमात नाही…
समस्या आहे
आपण प्रेमाला “स्वतःपेक्षा मोठं” बनवून टाकतो.
जिथे आपण स्वतःचं मूल्य विसरतो,
स्वतःची किंमत कमी करतो,
स्वतःवर अन्याय होऊ देतो…
तेव्हा प्रेम संपत नाही
पण आपण मात्र संपत जातो.
प्रेम कधीच आंधळं नव्हतं,
आपणच डोळे मिटून घेतले होते.
लोक प्रेम शोधतात, पण कदर शोधायला शिकत नाहीत.
नाती जपायला प्रयत्न लागतात,
कदर करायला मन लागतं,
आणि विश्वास ठेवायला धैर्य लागतं…
पण आजकाल?
सगळं तुटायला क्षणभर,
आणि कुणावर राग काढायला सेकंदभर.
रिलेशनशिपपेक्षा “ego” मजबूत,
समजून घेण्यापेक्षा “attitude” जास्त.
अशा जगात कोणाचं मन मोडणं सोपं…
आणि कोणाचं मन भरवणं कठीण.
प्रेम हे तितकंच सुंदर,
जितकं आपण स्वतःला जपतो.
आपल्याला न जपणाऱ्या लोकांसाठी तुटणं…
हे प्रेम नाही,
हे स्वतःशी केलेलं अन्याय आहे.
प्रेमात हरवू नका…
प्रेमात स्वतःला सापडा.
जिथे तुमची किंमत नाही
तिथून शांतपणे दूर जाणंही
एक प्रकारचं स्वतःवरचं प्रेम असतं.
Comments
Post a Comment