नातं जिवंत ठेवायचं असेल… तर मनाची धडधड ऐकावी लागते
नाती मोडतात ते मोठ्या कारणांनी नाही…
नाती मोडतात छोट्या छोट्या दुर्लक्षांमुळे.
आजकाल आपल्याकडे वेळच नाही
कुणासाठी? अगदी आपल्या लोकांसाठीसुद्धा नाही.
म्हणतात ना…
काळजी शब्दांनी नसते दिसत,
ती कृतीतून जाणवते.
आजच्या नात्यांना शब्द खूप मिळतात,
पण कृती मात्र अगदी कमी.
कोणीतरी आपली वाट पाहतं…
धीर धरतं…
मनात हजार गोष्टी दडवून ठेवतं…
पण आपण?
आपण मात्र एवढंच म्हणतो,
“व्यस्त होतो…”
“टाईम नव्हता…”
“मूड नव्हता…”
पण कुणी एकदा विचारलंच,
“माझी गरज तुला कधी वाटली?”
तर आपल्या गळ्यात शब्द अडकतात.
दूर राहणं नात्यांना काहीच होत नाही…
पण दुर्लक्ष मात्र नात्याच्या छातीत खंजीर बनून बसतं.
आपल्यासाठी कितीही हलकं असलं ना…
एखाद्याच्या ‘रीड करून न रिप्लाय’मध्ये
त्यांचं मन हजार वेळा तुटतं.
कधी फोन न करणं,
कधी भेटायला निघून जाणं,
कधी बोलण्यापेक्षा शांत राहणं
हे सगळं हळूहळू
नाती थकवायला लागतं.
म्हणतात ना,
“शांतता ही सर्वात मोठी किंकाळी असते.”
जेव्हा ती व्यक्ती बोलणं बंद करते ना…
तेव्हा समजावं की
मनातलं काहीतरी खूप खोलवर दुखलं आहे.
नातं जपायचं असेल तर
स्वतःहून पावलं टाकावी लागतात.
वाट पाहणं ही प्रेमाची खूण आहे,
पण
वाट पाहणाऱ्याला ‘दुर्लक्ष’ हा सर्वात मोठा दंड असतो.
आपण विचार करतो
“नंतर बोलू…”
“आज नाही तर उद्या भेटू…”
“आज वेळ नाही…”
पण कधी एक दिवस
उद्या उरलेलंच नसतं,
आणि भेटण्याची इच्छा
काळाच्या ओघात विझून गेलेली असते.
नात्यात प्रेम हवं,
आदर हवा,
पण त्याहून जास्त
उपस्थिती हवी.
शरीराने नाही…
मनाने.
नातं असतं ते companionship
“मी आहे तुझ्यासाठी”
ही भावना देणं.
हे जर जमलं नाही
तर कितीही वर्षांचं नातं
एक तासात परकं होतं.
आपल्याकडे बहाणे असतात
कामाचं,
परिवाराचं,
टेंशनचं…
पण त्या व्यक्तीचा एक बहाणा तरी
आपल्यासाठी नसतो का?
नातं जिवंत ठेवायला
मोठे sacrifices लागत नाहीत…
काही क्षण,
काही शब्द,
आणि थोडीशी मनापासून केलेली माया
यांनीही नातं सोनं होतं.
कितीही प्रेम असलं तरी
त्या प्रेमाला वेळ नसेल,
तर ते प्रेम हळूहळू मळू लागतं.
आणि शेवटी
दोन व्यक्ती समोरासमोर बसलेले असतात…
पण
नातं मात्र मागे वळून निघून गेलेलं असतं.
माणूस पैसा कमावतो,
यश मिळवतो,
मोठमोठी स्वप्नं उभारत बसतो…
पण
जो हात आपला धरायला तयार असतो
तो हात आपणच सुटू देतो.
नात्यांची कदर करा…
वेळ द्या…
काळजी दाखवा…
कारण
नातं सांभाळणं हे investment नाही,
ती आपली जाणीव असते.
Comments
Post a Comment