नाती तुटतात शब्द नसल्यामुळे

नाती तुटतात शब्द नसल्यामुळे

वाचतात ते प्रामाणिकपणामुळे.

आजकाल लोकांचं एक विचित्र धोरण झालंय
नातं नको असेल तर सांगत नाहीत,
फक्त शांत बसून समोरच्याला वेडं करत ठेवतात.

काय मिळतं यातून?
स्वतःचा इमेज चांगला ठेवायचा आणि
समोरच्याला गैरसमजांनी जाळायचं?

हे प्रेम नाही…
हे सभ्यता नाही…
ही भित्रेपणाची पद्धत आहे.

सगळ्यात मोठा खोटेपणा म्हणजे

“शांत राहून एखाद्याला त्रास देणं.”

समोरचा व्यक्ती मेसेज पाठवतो,
Call करतो,
विचारतो — “काय झालं?”,
“काही चुकलं का?”,
“तुझं वागणं असं का?”

आणि तुम्ही?
प्रत्युत्तर? काहीच नाही.

असं वागणं म्हणजे
समोरच्याला जाणूनबुजून काळजीत टाकणं.
ही सायलेंट ट्रीटमेंट
शब्दांपेक्षा जास्त जखमा करते.

एवढं सोपं वाक्य

“मला तू आवडत नाही, मला पुढे जायचं आहे.”
हेच बोलायला लोक घाबरतात.

का?
कारण प्रामाणिकपणा दाखवायला धैर्य लागतं.
शांत बसायला काही लागत नाही.

शांत राहणं म्हणजे सभ्यता नाही—
ते नात्यातील पलायन आहे.
ज्यांच्यात धैर्य नसतं,
तेच शांततेचा मुखवटा लावतात.

समोरची व्यक्ती चुकीची नसते…

तुम्ही बोलत नाही म्हणून ती स्वतःलाच दोष देत बसते.

“मी चुकलो का?”
“मी काय बोललं?”
“मी काय जास्त मागितलं?”
“त्याला का त्रास झाला?”
“त्याने उत्तर का दिलं नाही?”

हा गोंधळ
त्या व्यक्तीच्या मनावर
असा भार टाकतो
की स्वतःलाच तुच्छ वाटायला लागतं.

जिथे प्रेम नाही,
तिथं प्रामाणिक उत्तर तरी असावं ना?

उगाच स्वतःला देवदूत बनवू नका.

आणि दुसऱ्याला गुन्हेगार बनवू नका.

नातं नकोय?
ठीक.
मन बदललंय?
ठीक.
आवड कमी झाली?
ठीक.

पण
सांगण्याची हिंमत ठेवा.

आपण माणसं आहोत…
देव नाही.
आपले निर्णय बदलतात,
आपल्या भावना कमी-जास्त होतात.

हे सर्व ‘नॉर्मल’ आहे.
पण शांत बसून दुसऱ्याला वेडं बनवणं
हे अमानवी आहे.

नात्यांमध्ये सर्वात मोठा आदर

स्पष्ट बोलणं.

“आपण एकत्र नाही.”
“मला तुझ्याशी पुढे राहणं नाही.”
“माझं मन आता तुझ्याकडे नाही.”

या वाक्यांमध्ये त्रास आहे,
दुःख आहे,
पण इमानदारी आहे.

शांत राहण्यात मात्र
फक्त क्रूरता आहे.

नातं संपवणं चुकीचं नाही;
पण ते सांगण्याची हिम्मत नसणं ही मोठी चूक आहे.

लोक म्हणतात
“मी चांगला आहे, मी भांडत नाही.”
खरं तर तेच लोक
शांततेच्या आडून
सगळ्यात जास्त वेदना देतात.

कारण शब्दांनी दिलेली जखम भरते,
पण
कधी बोलच न केलेल्या व्यक्तीची जखम
आयुष्यभर दुखते.

Comments

Popular Posts