भ्रमाला प्रेम समजण्याची घाई आजचं नातं समाप्त करते
आजकाल नाती तुटतात ती प्रेमामुळे नाही…
भ्रमामुळे.
लोकांना प्रेम हवं नसतं,
त्यांना प्रेमासारखं दिसणं हवं असतं.
नात्यात माणूस कमी आणि
"अधिकार + अपेक्षा + कल्पना" जास्त असतात.
आपण अनेकदा प्रेम करतो असं वाटतं…
प्रत्यक्षात आपण
एक भ्रम, एक कल्पना, एक स्वतःचाच फोटो
मनात बसवून बसतो.
आणि समोरची व्यक्ती त्या फोटोसारखी नसली
की नातं कोसळतं.
खरा त्रास प्रेमाचा नसतो…
खरा त्रास “ती व्यक्ती माझ्यासाठीच आहे”
या चुकीच्या खात्रीचा असतो.
एखादी व्यक्ती सतत बोलते
आपण समजतो प्रेम आहे.
ती आपल्याला विचारते
आपण समजतो जिवापाड काळजी आहे.
ती दोन दिवस व्यस्त असली की
आपण समजतो ती बदलली.
हे प्रेम नाही
ही असुरक्षिततेची कल्पना आहे.
समोरच्याने एका वेळी “काय करत आहेस?” विचारलं,
आणि आपण आयुष्यभरासाठी
जगणं त्या व्यक्तीवर सोपवतो…
ही आपली चूक आहे.
भ्रमाची सगळी शक्ती “आपण स्वतः तयार करतो”.
नातं सुरू होताना
समोरचा माणूस कसा आहे हे न पाहता
आपण त्याचा एक वेगळाच
“आवृत्त” तयार करतो.
ती चांगली व्यक्ती आहे
= ती माझीच होईल
तो गोड बोलतो
= तो फक्त माझ्यासाठी आहे
ती नेहमी रिप्लाय देते
= तिला माझ्याशिवाय कोणी नको
तो माझ्यासोबत हसतो
= हा माझ्या भावना समजतो
हेच त्रासाचं मूळ.
समोरच्याने काही सांगायच्या आधी
आपणच सगळे अर्थ ठरवून टाकतो.
प्रेम जड नाही…
पण भ्रमाचं वजन कधी कधी आयुष्य मोडतं.
भ्रमात असताना आपण…
कुठलीच चूक दिसत नाही,
कुठलाही इशारा दिसत नाही,
समोरच्याचा कंटाळा दिसत नाही,
थंडपणा दिसत नाही.
आपण फक्त एकच पाहतो
“तो/ती माझीच/माझाच.”
आणि जेव्हा वास्तव डोक्यावर येतं
तेव्हा नातं नाही तुटत,
आपला अहंकार, आपली खात्री, आणि आपली दुनिया तुटते.
बहुतेक लोक प्रेमात नाही…
ते प्रेमाच्या कल्पनेवर प्रेम करतात.
खऱ्या प्रेमात
संवाद असतो,
एकमेकांचा आदर असतो,
जोडलेपण असतं,
वास्तव असतं.
भ्रमात
आपणच आपल्या मनात
एखादा काल्पनिक साथीदार बनवलेला असतो.
समोरची व्यक्ती तशीच वागेल
तर प्रेम…
नाहीतर राग, आरोप, वेदना.
उद्या ती व्यक्ती बदलली
की आपण म्हणतो
“तूच बदललीस!”
पण खरेतर ती बदलत नाही…
आपला भ्रम तुटतो.
जगात प्रेम जास्त नाही हरवत,
लोकांची कल्पनाशक्तीच हिंस्त्र झाली आहे.
“त्याने हसून बघितलं = त्याला माझ्याबद्दल वाटतं.”
“तिने रिप्लाय दिला = ती माझ्यावर फिदा आहे.”
“तिने फोटो टाकला = माझ्यासाठीच टाकला.”
हे भ्रम आहेत.
हे प्रेमाचे पुरावे नाहीत.
या चुका आजच्या generation मध्ये इतक्या वाढल्या आहेत
की प्रेम सापडण्यापूर्वीच
लोक expectations आणि assumptions ने
नातं संपवतात.
सगळ्यात धोकादायक भ्रम:
‘मी त्याच्यासाठी/तिच्यासाठी पुरेसा आहे.’
अनेकदा आपण
समोरच्याला आपली दुनिया मानतो,
त्याच्याशिवाय आपण शून्य आहोत असं समजतो.
हे प्रेम नाही…
ही भावनिक अवलंबित्वाची कैद आहे.
प्रेम तुम्हाला मुक्त करतं.
भ्रम तुम्हाला कैद करतो.
प्रेमात “आपण दोघं” असतं.
भ्रमात “फक्त मी, माझं, मला हवं” असतं.
खरं प्रेम तुटत नाही…
भ्रम मात्र एका दिवसात उडून जातात.
कारण भ्रमाचा पाया खोटा असतो.
नातं जास्त तुटत नाही,
नात्याबद्दलची आपली चुकीची धारणा तुटते.
प्रेमात जिथे समजूत असते,
भ्रमात तिथे अपेक्षा असतात.
प्रेमात जिथे धीर असतो,
भ्रमात तिथे उतावीळपणा असतो.
प्रेमात शांतता असते,
भ्रमात गोंधळ आणि असुरक्षितता असते.
“त्रास प्रेमात नाही…
त्रास त्या कथेचा असतो जी आपण स्वतःच मनात लिहून टाकतो.”
एखादी व्यक्ती तुमची नाही
याचा अर्थ तुम्ही वाईट नाही.
एखादी व्यक्ती दूर गेली
याचा अर्थ तुमच्यात कमतरता नाही.
कधी कधी प्रेम अपयशी होत नाही…
आपल्या स्वतःच्या मनातील चुकीच्या कथानकांनी
आपणच प्रेम अपयशी करतो.
म्हणूनच
प्रेम करा…
पण भ्रम करू नका.
कारण प्रेम सांभाळतं,
भ्रम फसवतो.
Comments
Post a Comment