शाळा, कॉलेज, मार्क शीट… सगळं महत्त्वाचं आहे

पण मुलांचं ‘जगणं’ त्याहून जास्त महत्त्वाचं आहे.”

आजकाल आई-बापांच्या आयुष्यात एकच धावपळ
शिक्षण, फी, मार्क, करिअर, आणि पुन्हा शिक्षण.

मुलं चांगली शिकली, चांगली नोकरी मिळाली,
मग त्यांनी सुखी राहावं
हा हेतू चूक नाही.
पण विचार करा

या धावपळीत आपण मुलांना काय देतोय?
आणि काय गमावतोय?

होय, शिक्षण महत्त्वाचं आहे…
पण त्यांचे भावना, संगती, वागणूक, विचार, भीती, चुका, आणि सत्य
यांपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे का?

आपण मुलांना ‘शाळेत पाठवतो’… पण त्यांना ‘जीवन’ शिकवत नाही.

आज अनेक पालक
शाळा, क्लास, ट्युशन, स्पर्धा परीक्षांमध्ये
मुलांना ढकलत राहतात…
पण एकदा सुद्धा विचारत नाहीत

“तू खरंच ठीक आहेस का?”
“तुला काही त्रास होतोय का?”
“कोणी तुला ब्लॅकमेल करतंय का?”
“कोणी चुकीचं शिकवतंय का?”
“कोणी तुझा उपयोग करून घेतोय का?”

म्हणूनच आज मुलं
बाहेरच्या जगात
अतिशय एकटी पडत आहेत.

आपल्या मुलांचं जीवन इंटरनेटवर चालू आहे…

आणि आपण अजूनही जुन्या विचारात जगतोय.

आपण समजतो
मुलगा मोबाईलवर आहे म्हणजे ‘गेम खेळतोय’.
पण तो कुणाशी चॅट करतोय?
कुणी त्याला brainwash करतंय?
कोणी पैसे मागतंय?
कोणी फोटो मागतंय?
कोणाच्या धमकीत अडकतोय?

आपल्याला माहिती असतं का?
नाही.
कारण आपण विचारणार नाही.
त्यांना सांगायला धाडस होणार नाही.

मुलींना तर घराबाहेर जायला भीती
पण घरातच कोणत्या अॅपवर कोण बोलतंय
हे कोणाला माहिती?

“माझा मुलगा चांगला आहे”

आणि
“माझी मुलगी चांगली आहे”
हे फक्त पालकांचे विश्वास असतात
वास्तव वेगळं असतं.

हे कटू वाटेल पण सत्य आहे:

 काही मुलगे खरोखर चुकीच्या संगतीत जातात
 काही मुलगे मुलींना impress करण्यासाठी खोटं बोलतात
 काही मुलगे व्हायरल व्हिडिओचा वापर करतात
 काही मुलगे गुन्ह्यात अडकतात किंवा अडकवले जातात

आणि
 काही मुली मुलांना पैसे, गिफ्ट, फसवणूक यासाठी वापरतात
 काही मुली फोटो-व्हिडिओमध्ये फसतात
 काही मुलींना ब्लॅकमेल केलं जातं
 काही मुली नात्याच्या नावावर exploit केल्या जातात

आणि ह्याच्या मागचं कारण एकच
संवादाचा अभाव.

पालकांना फक्त जवळच्या गोष्टी दिसतात…

पण मुलाचं आयुष्य सावल्यांमध्ये चालत असतं.

रोज कॉलेजला जातात— पण खरंच जातात का?
क्लासचा बहाणा— पण खरंच क्लास आहे का?
ग्रुप स्टडी— पण खरंच अभ्यास चाललाय का?
फ्रेंड्सचा गट— पण ते मित्र की शिकार करणारे लोक?

हे विचारायला पालक लाजतात.
आणि मुलं सांगायला घाबरतात.

परिणाम?
चुका वाढतात… नातं कमी होतं.

संस्कार देणं म्हणजे फक्त “चांगलं वाग” सांगणं नाही

संस्कार म्हणजे ‘चुकीच्या वेळेला तुमच्या मागे उभं राहणं’.

मुलांना बंदी घालून नाही
तर त्यांच्या मनात विश्वास निर्माण करून
जपावं लागतं.

मुलगा चांगला वाढला पाहिजे
पण असे मित्र नकोत
जे त्याला सिगरेट, दारू, गोंधळ, भांडणात ढकलतील.

मुलगी शिकली पाहिजे
पण ती कोणावर अंधविश्वास ठेवून
स्वतःचं नुकसान करत नाही ना?
यावर लक्ष द्या.

पालकांनी मुलांना काय द्यायला हवं?

 बोलण्याची मोकळीक
 चुका कबूल करण्याची जागा
 दबाव नसलेली भीतीरहित चर्चा
 प्रायव्हसीचा आदर
 योग्य-चुकीचं नीट समजावणं
 ऑनलाईन जगाची सुरक्षितता
 संगतीचं निरीक्षण
 मनाची सुरक्षा

मुलांना संरक्षण देणं म्हणजे
जगापासून लपवणं नाही
तर जगात टिकावं कसं
हे शिकवणं.

मुलांवर प्रेम आहे, पण लक्ष नाही.
हेच आजची सर्वात मोठी समस्या.

फक्त पुस्तके, मार्क, कॉलेज, करिअर
हे सगळं नंतरचं आहे.

मुलं जिवंत, सुरक्षित, स्वस्थ, समजूतदार राहिली
तर हे सगळं आपोआप मिळणारच.

मुलांना ‘टॉपर’ बनवण्यापेक्षा
त्यांना ‘चांगला माणूस’ बनवणं महत्त्वाचं आहे.

कारण जगात शिक्षित लोक खूप आहेत
पण समजूतदार, जबाबदार आणि सुरक्षिततेची जाणीव असलेले फार कमी.


Comments

Popular Posts