हल्ली आकर्षणाला प्रेम समजणारे वाढलेत…
“हल्ली आकर्षणाला प्रेम समजणारे वाढलेत…
आणि त्या चुकीच्या पावलांची किंमत आयुष्यभर भरावी लागते.”
आजच्या पिढीची एक मोठी समस्या म्हणजे
जलद आकर्षण, जलद इच्छा… आणि त्याहून जलद निर्णय.
ज्यात काही मुलं स्वतःचा आणि इतरांचाही संसार उद्ध्वस्त करतात.
हळूहळू एक ट्रेंड वाढताना दिसतोय
लग्न झालेल्या स्त्रियांकडे बघणं,
त्यांच्याशी जवळीक वाढवणं,
हलक्या-फुलक्या बोलण्यातून “काही तरी” वेगळं शोधणं.
काही मुलांना वाटतं
“ती मला समजते.”
“ती माझी काळजी घेते.”
“मी तिचा खास आहे.”
पण ती भावना नसून प्रौढांचे भावनिक तणाव, आणि मुलांचं अपरिपक्व आकर्षण असतं.
लग्न झालेली स्त्री “फ्री” नसते…
तीच्या आयुष्यात एक कुटुंब, जबाबदाऱ्या, आणि विश्वासाचं देणं असतं.
पुरुष असो की स्त्री
जेव्हा लग्नाच्या नात्यात असतात,
तेव्हा त्यांच्यामागे फक्त “एक व्यक्ती” नसते,
तर एक पूर्ण घर, समाज, कुटुंब, आणि त्यांच्या मुलांचं भविष्य असतं.
अशा वेळी बाहेरचं एखादं आकर्षण
क्षणिक मजा वाटतं,
पण त्याचा परिणाम आयुष्यभर जखमा देणारा असतो.
काही स्त्रिया भावनिकरित्या कमजोर असतात,
काही कुतूहलाने जवळ येतात,
काही फक्त बोलण्यापुरत्या जवळ ठेवतात.
पण मुलांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी
ती एक परिपक्व स्त्री असते… तुम्ही अजून वाढणारा मुलगा.
आणि या समीकरणात बहुतांश वेळा
तुटतं ते मुलाचंच आयुष्य.
काही स्त्रिया हुशार असतात…
वाटेल तितका फायदा घेतात.
मुलगा तिच्यावर खर्च करतो
गिफ्ट, पैसे, पेट्रोल, ट्रिप, हॉटेल…
आणि ती हळूच म्हणते,
“माझ्यासाठी कोण करणार? तूच ना?”
मुलगा तिच्या बोलण्याला प्रेम समजतो,
आणि नकळत तिच्या समस्यांचा “ATM” बनतो.
काही वेळा तर स्त्रीचं आयुष्य नीट चालू असतं,
पण रिकामेपणा, कौतुकाची कमतरता
यामुळे ती कोणाला तरी बोलण्यात गुंतवते.
आणि मुलगा त्या “भावनिक खेळात”
स्वतःच बुडतो.
आणि काही प्रसंगी?
थेट गुन्हे दाखल होतात.
हलक्या बोलण्यातून सुरू झालेली गोष्ट
कधी “शारीरिक जवळीक” पर्यंत जाते…
आणि एक दिवस समस्या निर्माण झाली की
स्त्री स्वतःला वाचवण्यासाठी
सरळ छळ, शोषण, जबरदस्ती, ब्लॅकमेल, अगदी रेप केस करते.
समाजात अशी शेकडो उदाहरणे आहेत
ज्यात मुलगा चुकीचा नव्हता,
पण परिस्थितीत तो अपराधी ठरला.
कारण काय?
जिच्या आयुष्यात तुम्ही ‘एक पर्याय’ होता,
तिच्या आयुष्यात तिचा “कायमचा संबंध” जास्त महत्त्वाचा असतो.
आणि तिथे तुम्ही बळीचा बकरा बनता.
म्हणूनच युवकांनी स्वतःचं आयुष्य ओढून घेऊ नये.
तुमचा वेळ, पैसा, मेंदू, भावना…
या सगळ्याची गुंतवणूक चुकीच्या ठिकाणी झाली
तर तुमचं भविष्यच अडकतं.
लग्न झालेल्या स्त्रियांकडे बघून
“मॅच्युअर प्रेम” मिळेल असं नाही.
बहुतेक वेळा तिथे फक्त
रिकाम्या भावनांची देवाणघेवाण आणि कसोटी असते.
आयुष्य नीट उभं करा,
स्वतःला मजबूत करा,
करिअर, पालक, भविष्य
या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
तुमची मेहनत,
तुमचा पगार,
तुमची प्रतिष्ठा,
तुमचा स्वाभिमान
एका चुकीच्या आकर्षणात गमावू नका.
सोपं सत्य
जे तुमच्या नशिबात नाही,
ते जबरदस्ती मिळवण्याचा प्रयत्न केला
तर आयुष्यच नाश पावतो.
योग्य वेळी योग्य मुलगी मिळते…
जर तुमची कृत्यं योग्य असतील तर.
आणि जर तुम्हीच चुकीच्या वाटेवर गेलात,
तर परत त्याच चुका तुमच्या मार्गात उभ्या राहतात.
याचं नाव कर्म.
शेवटचं वाक्य
आकर्षणावर चालणारे पाय नेहमी घसरतात,
पण संस्कारांवर उभे राहणारे पाय
कधीच ढळत नाहीत.
Comments
Post a Comment