मुलींच्या चुकांपेक्षा मोठी समस्या
मुलींच्या चुकांपेक्षा मोठी समस्या म्हणजे…
त्या चुका घराला माहितच नसतात.
आजच्या काळात बाहेरच्या नात्यांत अडकणाऱ्या मुलींची संख्या वाढली आहे.
पण त्याहून मोठं सत्य हे की
हे सगळं तिच्या घराला, तिच्या आईलासुद्धा माहिती नसतं.
आईही स्त्री आहे, तिलाही आयुष्याचं सत्य माहित आहे,
पण मुलगी काय करते, कुणासोबत फिरते,
तिच्या मनात काय चाललंय,
मोबाईलमध्ये काय सुरू आहे…
हे कळण्याइतका संवादच घरात नसतो.
समस्या मुलीने चूक केली म्हणून नाही,
समस्या ही ती गुपित ठेवते म्हणून मोठी होते.
आई-मुलीचं नातं आज तुटक झालंय…
पूर्वीच्या घरात जी संवादाची उब होती, तीच हरवली आहे.
पूर्वी मुली आईला सगळं सांगायच्या
चुका, भीती, त्रास, प्रेम… सर्व.
आईचं कान हे मुलीचं सुरक्षित ठिकाण होतं.
आज ही जागा मोबाईलने घेतली.
आई कामात,
मुलगी तिच्या फोनमध्ये,
आणि दोघींमध्ये हजार गोष्टी दुरावल्या.
आई “माझी मुलगी चांगली आहे” या खात्रीवर जगते,
आणि मुलगी “आईला सांगायला नको” या भीतीवर.
या दोन्ही गोष्टी खूप धोकादायक असतात.
आई म्हणून लक्ष ठेवणं म्हणजे संशय नाही—
ते सुरक्षिततेचं कवच आहे.
काही लोक म्हणतात
“मोबाईल बघणं योग्य नाही, हक्क नाही.”
पण जेव्हा मुलीचा मोबाईलच तिच्या आयुष्याला
चुकीच्या लोकांशी जोडत आहे,
तिला भावनिकरित्या अडकवत आहे,
किंवा चुकीच्या दिशेला नेत आहे…
तेव्हा आईने लक्ष ठेवणं ही जबाबदारी ठरते.
मुलीचं स्वातंत्र्य महत्त्वाचं,
पण मुलीची सुरक्षितता त्याहून महत्त्वाची.
आई म्हणून
कोणाशी बोलते,
कोण भेटतं,
काय कंटेंट पाहते,
फोनवर काय सुरू आहे
हे जाणून घेणं म्हणजे हस्तक्षेप नाही,
तर सावधगिरी आहे.
समस्या मुलगी चुकीच्या नात्यात आहे म्हणून नसते…
समस्या ही की तिला घरात कोणाशी बोलता येत नाही म्हणून असते.
बाहेरचा पुरुष कौतुक करतो,
लक्ष देतो,
केअर दाखवतो,
आणि मुलगी भावनिकरित्या त्याच्याकडे ओढली जाते.
कारण घरात
आई व्यस्त,
वडील कठोर,
आणि मुलगी मानसिकदृष्ट्या एकटी.
ही एकटेपणाची जागाच
तिला चुकीच्या दिशेने ढकपते.
आई-मुलीच्या नात्यात संवाद बंद झाला की,
समस्या शांतपणे वाढत जाते.
आईला मुलगी काय घालते दिसतं,
पण काय सहन करते दिसत नाही.
आईला तिचं हसू दिसतं,
पण रडणं दिसत नाही.
आईला ती बाहेर कुठे जाते दिसतं,
पण कुणा सोबत जाते हे कधीच कळत नाही.
घरात लक्ष नसताना,
मुलगी बाहेरचं लक्ष शोधायला लागते.
आजच्या आईची एक मोठी चूक
तिने मुलीला स्वातंत्र्य दिलं,
पण स्वातंत्र्याबरोबर शिकवणी दिली नाही.
मोबाईल दिला,
ऑनलाईन जग दिलं,
फ्रेंड्स दिले,
स्वातंत्र्य दिलं…
पण सांगितलं नाही
कुणावर विश्वास ठेवायचा?
कुणापासून अंतर ठेवायचं?
कुणाचं उद्देश स्वच्छ असतो आणि कुणाचं नाही?
जेव्हा आई शिकवत नाही,
तेव्हा जग शिकवतं
आणि जगाचं शिकवणं नेहमीच सुरक्षित नसतं.
सर्वात महत्त्वाचं
आईने जाणीव ठेवली नाही तर मुलगी स्वतःच हरवते.
लक्ष ठेवा म्हणजे शंका नाही.
मोबाईल पाहा म्हणजे गैर नाही.
संभाषण करा म्हणजे नियंत्रण नाही.
आई म्हणून तुझी भूमिका आहे
मुलीला बाहेरच्या चुकीच्या नात्यांपासून वाचवणं.
कारण या नात्यांची किंमत
मुलगीच सर्वात जास्त भरते
मानसिक, सामाजिक, भावनिक.
शेवटी
मुलीला चुकीपासून वाचवायचं असेल,
तर तिला घरात ऐकणारा कान आणि समजणारी आई हवी.
आई म्हणून
फक्त स्वयंपाक, कामं, जबाबदाऱ्या पाहू नकोस…
मुलीचं मनही पाहा.
तिच्या वागण्यातल्या बदलांवर लक्ष ठेवा.
तिच्या मैत्री, चॅट, कॉल्स, मूड…
हे सर्व तिच्या सुरक्षिततेचे संकेत असतात.
मुलीचा फोन पाहणं चुकीचं नाही,
तिला चुकीपासून वाचवणं हेच खरं मातृत्व आहे.
Comments
Post a Comment